लोकसत्ता टीम

नागपूर : गंगाजमुना वस्तीत अ‌वघ्या १५ वर्षीय मुलीला आंबटशौकीन ग्राहकांच्या स्वाधीन करून तिला शारीरिक संबंधासाठी बळजबरी करण्यात येत होती.

या वस्तीत पोलिसांनी छापा घालून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले तर तिच्याकडून देहव्यापार करवून घेणाऱ्या महिलेला अटक केली. ही कारवाई शुक्रवारी दुपारी केली असून भुरी सोनू उचिया (वय ४०, रा. बदनापूर, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश) असे अटकेतील महिला दलालाचे नाव आहे. भुरी ही सध्या गंगाजमुना वस्तीतील सिमेंट रोड, बालाजी मंदिराजवळ राहते.

आणखी वाचा-लॉजवर नेऊन गुंगीचे औषध देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

गंगाजमुना वस्तीत कश्मीरीबाई उचिया बागडे गल्लीतील एका खोलीत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला आंबटशौकीन ग्राहकांशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी करीत असल्याची माहिती लकडगंज पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे धाड टाकली असता आरोपी महिला आर्थिक फायद्यासाठी अल्पवयीन मुलीला एका ६०वर्षाच्या ग्राहकासोबत संबंध ठेवण्यासाठी बळजबरी करताना आढळली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी महिला मुलीसाठी ग्राहक व जागा उपलब्ध करून देऊन देहव्यापार करवून घेत असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी महिलेच्या ताब्यातून एका १५ वर्षाच्या मुलीची सुटका करण्यात आली. आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली. भुरी ही गेल्या दोन महिन्यांपासून त्या मुलीकडून देहव्यापार करवून घेत होती. ग्राहकांकडून ती पैसे घेऊन मुलीवर बळजबरी करीत होती. गंगाजमुनात आणखी अल्पवयीन मुली देहव्यापारात कार्यरत असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.