चंद्रपूर : रेल्वे पोलीस दल चंद्रपूर आणि सीआयबी नागपूरच्या पथकाने एकाच दिवशी कारवाई करीत रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या १४ दलालांना अटक केली. उन्हाळी सुट्ट्या व लग्नसराईमुळे प्रवाशांची रेल्वेत गर्दी सातत्याने वाढत आहे. त्याचा फायदा घेत दलालांकडून रेल्वे आरक्षणाच्या इ-तिकिटांचा काळाबाजार केला जात आहे.

हे दलाल गरजू प्रवाशांना तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी मोठी रक्कम घेतात. या संदर्भात मिळालेल्या माहितीच्या आधारावर रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त मनोज कुमार, नागपूर यांनी रेल्वे पोलीस दलाचे चंद्रपूर निरीक्षक के. एन. राय, एन.पी. सिंग यांना अशा दलालांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार चंद्रपूर हद्दीतील दलालांवर पाळत ठेवण्यात आली आणि कारवाईसाठी आरपीएफ पोलीस स्टेशन चंद्रपूर, नागपूर आणि विभागीय मुख्यालय यांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले. शनिवारी या पथकाची पाच भागात विभागणी करण्यात आली आणि रेल्वे कायद्यांतर्गत विविध शहरांमध्ये एकाच वेळी छापे टाकण्यात आले. अचानक झालेल्या कारवाईमुळे दलालांना सतर्क होण्याची संधी मिळालीच नाही.

हेही वाचा…“देशाच्या प्रगतीसाठी महायुतीचा विजय हाच योग्य पर्याय,” राळेगाव येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या छाप्यात चंद्रपूर शहरात ५, घुग्घुस ५, वणी २, भद्रावती १ आणि माजरी येथे १, अशा १४ दलालांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ५ लाख १० हजार ४८१ रुपये किमतीची एकूण २७१ तिकिटे जप्त करण्यात आली. ही कारवाई मनोजकुमार वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त यांच्या निर्देशानुसार निरीक्षक के.एन.राय, एन.पी.सिंग, उपनिरीक्षक आर.के.यादव, हरवंश सिंग, प्रियांका सिंग, सचिन नागपुरे, एन.पी.वासनिक, आर.के.भारती, मुकेश राठोड, अश्विन पवार, यांनी केली. विपिन दातीर, सागर भगत, वासुदेव, सुमित, शिरीन, सागर लाखे, व्ही.एस.यादव, हरविंदर, विकास, महीलाल यांनी केली.