नागपूर: मिचाँग चक्रीवादळामुळे रेल्वेने ११४ गाड्या रद्द केल्या असून नागपूरमार्गे धावणाऱ्या ३५ हून अधिक रेल्वेगाड्यांचा त्यात समावेश आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने दक्षिण भारतात धडकलेल्या चक्रीवादळाने चेन्नईसह लगतच्या भागात हाहाकार उडवला आहे.

वादळाची आंध्र प्रदेशच्या दिशेने आगेकूच सुरू असून त्याचा विमानसेवेसोबतच रेल्वेसेवेलाही फटका बसला आहे. ७ डिसेंबरपर्यंत प्रवासाला सुरुवात होणाऱ्या गाडया स्थानकापासूनच रद्द राहतील.

हेही वाचा… उपमुख्यमंत्री कार्यालयाने आमदार केचेंची कामे थांबविली? राजकीय वर्तुळात चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दक्षिणेकडून येणाऱ्या आणि नागपूरमार्गे धावणाऱ्या गाड्यांमध्ये जीटी एक्स्प्रेस, केरला एक्स्प्रेस, तामिळनाडू एक्स्प्रेस, गोरखपूर एक्स्प्रेस, चेन्नई -छपरा-चेन्नई एक्स्प्रेस, चेन्नई- जयपूर- चेन्नई एक्स्प्रेस यासारख्या प्रमुख प्रवासी गाड्यांचा समावेश आहे.