नागपूर : राज्यातील काही भागात पावसाने उसंत दिल्यामुळे विजेची मागणी पुन्हा वाढत आहे. बुधवारी (१८ सप्टेंबर) दुपारी २.३० वाजता राज्यात विजेची मागणी २३ हजार ६१८ मेगावाॅट नोंदवली गेली. ही मागणी १४ ऑगस्टला दुपारी २ वाजता २२ हजार ८६२ मेगावाॅटच्या जवळपास होती.

मध्यंतरी राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस पडत असल्याने विजेची मागणी घटली होती. परंतु आता बऱ्याच भागात पावसाने उसंती दिली आहे. त्यामुळे विजेची मागणी वाढू लागली आहे. राज्यात ३० जुलैच्या दुपारी १.३० वाजता विजेची मागणी १९ हजार ८३२ मेगावॉट होती. ही मागणी १४ ऑगस्टला दुपारी २ वाजता २२ हजार ८६२ मेगावॉटपर्यंत वाढली. १८ सप्टेंबरला दुपारी २.३० वाजता राज्यात विजेची मागणी २३ हजार ६१८ मेगावाॅट नोंदवली गेली. पावसाच्या उसंतीने वातानुकूलित यंत्र, कुलर, पंखे, कृषी पंपासह विद्युत उपकरणांचा वापर वाढल्याने ही मागणी वाढली आहे.

Eknath Shinde Buldhana, Congress leaders Buldhana,
बुलढाणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यात घुसण्याचा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न; काळे झेंडे दाखविले
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Vijay Wadettiwar, Nagpur project, Gujarat,
नागपूरचा प्रकल्प गुजरातला जाणार हे वडेट्टीवार यांना कोणत्या सुत्रांनी सांगितले? उद्योगमंत्री उदय सामंत यांचा सवाल
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Narendra Modi Wardha, PM Narendra Modi,
पंतप्रधानांचा दौरा आणि सुरक्षेचा फास, शाळांना सुट्टी व नागरिक घरात
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
Deputy CM Devendra Fadnavis Advised to nitish rane to avoid controversial statements
नागपूर : वादग्रस्त वक्तव्य टाळा, फडणवीस यांचा नितेश राणेंना सल्ला
girl raped Nagpur, girl raped by auto driver,
धक्कादायक! उपराजधानीत ऑटोचालकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

हे ही वाचा…नागपूरचा प्रकल्प गुजरातला जाणार हे वडेट्टीवार यांना कोणत्या सुत्रांनी सांगितले? उद्योगमंत्री उदय सामंत यांचा सवाल

बुधवारी राज्यात विजेची मागणी दुपारी २.३० वाजता २३ हजार ८१८ मेगावॉट होती. त्यापैकी २० हजार ३८५ मेगावॉट मागणी महावितरणची होती. मुंबईत विजेची मागणी ३ हजार २३३ मेगावाॅट नोंदवली गेली. एकूण मागणीच्या तुलनेत १५ हजार १५६ मेगावॉट विजेची निर्मिती राज्यात झाली. केंद्राच्या वाट्यातून राज्याला ८ हजार ५८४ मेगावॉट वीज मिळाली. राज्यात सर्वाधिक ६ हजार २३० मेगावॉट वीजनिर्मिती महानिर्मितीकडून झाली. त्यात औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील ५ हजार ८५१ मेगावॉट, उरण गॅस प्रकल्पातील २७३ मेगावॉट, जलविद्युत प्रकल्पातील ७१ मेगावॉट, सौरऊर्जेच्या २६ मेगावाॅट वीजनिर्मितीचा समावेश होता. खासगी प्रकल्पांपैकी अदानीकडून २ हजार ७६१ मेगावॅट, जिंदलकडून ९७२ मेगावॅट, आयडियलकडून २३० मेगावॅट, रतन इंडियाकडून ६३३ मेगावॅट, एसडब्ल्यूपीजीएलकडून ३८५ मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात आली.

हे ही वाचा…Mpsc Exam Date 2024 : एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा कधी होणार? पुढील आठवड्यात महत्त्वाची बैठक

एप्रिल महिन्यात सर्वोच्च मागणीची नोंद

महावितरणकडून यंदाच्या उन्हाळ्यात १७ एप्रिल २०२४ रोजी सर्वाधिक २५ हजार ६८ मेगावाॅट विजेची मागणी नोंदवली गेली. तर २७ फेब्रुवारीला २५ हजार २३ मेगावाॅट, २७ मार्चला २५ हजार ३५ मेगावाॅट, १९ एप्रिलला २४ हजार ८०५ मेगावाॅट, २२ मे रोजी २४ हजार ६०४ मेगावाॅट, ३ जूनला २४ हजार ४४३ मेगावाॅट विजेची मागणी नोंदवली गेली. परंतु आता ही मागणी तेव्हाच्या तुलनेत कमी झाली आहे. परंतु पाऊस लांबल्यास ही मागणी आणखी वाढण्याची शक्यता वीज क्षेत्रातील जाणकारांकडून वतर्वली जात आहे.