वर्धा: आर्वीत आज सुन्न वातावरण आहे. कारण दोन दिवसापूर्वीच गाठीभेटी घेवून निघालेल्या राजश्री प्रकाश गांडोळे या अपघातग्रस्त बस मधील प्रवासात होत्या. हा परीवार पुणे येथेच मोठ्या मुलाकडे स्थायी झाला होता. दुसरा उच्च शिक्षित मुलगा नुकताच पुण्यात नोकरीस लागला. त्याला काही आवश्यक कागदपत्रांची गरज पडल्याने गांडोळे पती पत्नी गावाकडे आर्वी येथे आले.

अत्यंत धार्मिक वृत्तीच्या असलेल्या राजश्री ताईंनी या मुक्कामात देवळात पूजाही घातली. प्रवासाला निघायचे म्हणून तयारी झाली. या वेळी त्या एकट्याच जाणार होत्या. पती प्रकाशराव यांनी त्यांना बसवर सोडले. पण पुढे काय अघटीत घडणार याची उभायतास मुळीच कल्पना आली नसेल.

हेही वाचा… Buldhana Accident : मुख्यमंत्री म्हणाले, “समृद्धीवरील अपघातांचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास; उपायोजनांची प्राधान्याने अंमलबजावणी”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज अपघात घडल्याचे घरी वृत्त आले. पती कारंजा येथून शिक्षिकी पेशातून निवृत्त झाले आहेत. सात दिवसापूर्वी साजरा केलेला लग्नाचा वाढदिवस हा शेवटचा तर ठरणार नाही ना, असा सूर परिसरात ऐकायला मिळाला.