नागपूर : नागपुरातील १६ वर्षीय मुलीचे अपहरण केल्यानंतर तिला तेलंगणातील एका फार्महाऊसवर कोंंडून ठेवले. तिच्यावर सलग तीन वर्षे बलात्कार करण्यात आला. त्या अपहृत मुलीचा शोध मानवी तस्करी विरोधी पथकाने लावला असून तिला ११ दिवसांच्या बाळासह ताब्यात घेतले. अपहरणकर्त्या युवकाला अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलगी स्विटी (काल्पनिक नाव) नागपुरातील सीताबर्डी परिसरात राहते. ती २०१९मध्ये १२ व्या वर्गात शिकत होती. त्यावेळी  आरोपी आकाश ओमप्रकाश गुल्हाणे (२३) रा. तेलंगणा याची आणि स्विटीची ओळख झाली.  आकाशचे तिच्यावर एकतर्फी प्रेम जडले. मात्र, तिने  नकार दिला.  त्याने तिला ३१ मार्च २०१९ ला तासाभरासाठी फिरायला जायचे असल्याचे सांगून दुचाकीवर बसवले. सायंकाळच्या सुमारास त्याने तिला खाण्याच्या पदार्थात गुंगीचे औषध देऊन थेट तेलंगणात नेले.

हेही वाचा >>> पुणे : प्रियकराच्या त्रासामुळे ‘तिने’ रेल्वेखाली केली आत्महत्या; प्रियकर अटकेत

गावापासून लांब असलेल्या एका शेतातील घरात ठेवले. आकाशने तिला महाराष्ट्रातील एका जंगलात असल्याचे सांगितले. दुसरीकडे मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने आईवडिलांनी  सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, स्विटीकडे मोबाईल नव्हता तसेच आकाशबाबत तिच्या कुटुंबीयांना माहिती नव्हती. त्यामुळे इतक दिवस मुलीचा शोध लागला नाही.

हेही वाचा >>> रुग्णाचा निवासी डॉक्टरवर हल्ला; यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयातील दीड हजार डॉक्टर रस्त्यावर

बेशुद्ध असतानाच अत्याचार

स्विटी बेशुद्ध असतानाच तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ती शुद्धीवर आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. आकाशने तिला फार्महाऊसवर कोंडून ठेवले आणि सतत लैंगिक अत्याचार केले. तिने घरी नेऊन सोडण्याबाबत विचारणा केल्यास तिला आकाश जबर मारहाण करीत होता. त्यामुळे भीतीपोटी ती गप्प होती. या अत्याचारातून ती गर्भवती झाली आणि तिला नुकतेच ११ दिवसांचे बाळ झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असा लागला सुगावा

मुलीचे अपहरण करून तेलंगणाकडे नेल्याची माहिती मानवी तस्करी प्रतिबंधक विभागाच्या प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक रेखा संकपाळ यांना मिळाली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात एपीआय संकपाळ, हवालदार राजेंद्र अटकाळे, ज्ञानेश्वर टोके, सुनील वाकडे, शरीफ शेख, ऋषीकेश डुंबरे आणि पल्लवी वंजारी यांनी तेलंगना राज्यात शोध घेतला. तीन दिवस सतत शोधाशोध केल्यानंतर आकाशला अटक केली. स्विटीला ११ दिवसांच्या बाळासह ताब्यात घेतले. स्विटीला आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले. तिने आकाशने केलेल्या लैंगिक अत्याचाराच पाढा वाचला, त्यामुळे पोलिसांच्याही अंगावर काटा उभा राहिला.