लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : तलाठी भरतीच्या पेपरफुटी प्रकरणाने राज्यातील वातावरण तापले आहे. सरकारने चौकशी न करता निकाल जाहीर केल्याने विद्यार्थ्यांचा याला विरोध होत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या अशा मनमानी धोरणाच्या विरोधात आम आदमी पार्टीने आक्रोश मोर्चा काढला. सरकारने विशेष चौकशी समितीकडून पेपरफुटी प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आक्रोश मोर्चाचे नेतृत्व आम आदमी पार्टी विदर्भ संघटन मंत्री भूषण ढाकुलकर, डॉ. शाहिद जाफरी व सुनील वाडसकर, शहर अध्यक्ष अजिंक्य कळंबे, नागपूर ग्रामीण अध्यक्ष ऋषभ वानखेडे यांनी केले. देवेंद्र फडवणीस हे गृहमंत्री असतानासुद्धा पेपर फुटी प्रकरणावर कुठल्याही प्रकाराची कठोर कारवाई झाली नसल्याचा आरोप करत यावरही शंका उपस्थित करण्यात आली. या आंदोलनामध्ये आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, स्पर्धा परीक्षा देत असलेले विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी वाचा-मागच्या सुट्टीवरून वेळेत परतला नाही म्हणून कैद्याला आता सुट्टी नाकारली; उच्च न्यायालय म्हणाले, चुकीचे आहे…

प्रत्येक परीक्षांमध्ये पेपरफुटी व गैरप्रकार होत असल्याने स्पर्धा परीक्षांच्या तरुणांनी आज कोणाकडे न्यायाची अपेक्षा करायची, असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. तसेच मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्र सरकार नोकर भरतीत घोटाळा करत असल्याचा तसेच तलाठी भरती घोटाळ्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे नेते आणि अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recruitment scam even when devendra fadnavis is home minister aap asked the question dag 87 mrj
First published on: 31-01-2024 at 16:38 IST