नागपूर: डॉ. बाबासाहेव आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन चळवळीचे अस्तित्व वाचवण्यासाठी नागपूर येथे ‘रिपब्लिकन फेडरेशन’ची स्थापना करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून आंबेडकरी राजकारण दिशाहीन झाले असून, केवळ बाबासाहेबांच्या नावावर राजकीय लाभ घेण्याची स्पर्धा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर चळवळीची नव्याने उभारणी करणे आणि मूळ उद्दिष्ट केंद्रस्थानी ठेवून पुढे जाण्याचे ठरवले आहे, अशी माहिती फेडरेशनच्या प्रमुख नेत्यांनी दिली.
रिपब्लिकन फेडरेशनचे मुख्यसंयोजक मिलिद पखाले, सहसंयोजक छाया खोब्रागडे, नरेश वाहणे आणि कोषाध्यक्ष डॉ. सुरेंद्र बोरकर यांनी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. आणि फेडरेशनच्या संकल्पना, उद्दिष्टे, पुढील कार्यक्रम याबाबत सविस्तर चर्चा केली.
मिलिंद पखाले म्हणाले, सध्याची आंबेडकरी चळवळ अप्रामाणिकपणा व पैशांच्या राजकारणात अडकून लयास गेली आहे. समाजात प्रबोधन, संघटन व वैचारिक जागृती कमी पडत आहे. निकोप राजकीय संस्कृती
महापालिकेची निवडणूक मुद्यांवर लढणार
आगामी महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन फेडरेशन शिक्षण, आरोग्य सेवा, रस्त्यांची सुधारणा व रोजगार या महत्वाच्या सामाजिक सुद्यांना प्राधान्य देणार आहे. महापालिकेच्या अनेक शाळा बंद पडल्या आहेत. त्यातील बहुतांश शाळा दोन वर्षांत नव्याने सुरू करण्याचे उद्दिष्ट असेल.रुजवण्यात ‘रिपब्लिकन फेडरेशन’ यशस्वी ठरेल, असा विश्वास आहे.
छाया खोब्रागडे म्हणाल्या, एक काळ असा होता जेव्हा ‘रिपब्लिकन’ हे शब्द आंबेडकरी समाजाच्या आत्मसन्मानाचे प्रतीक होते. मात्र आज, त्याचे अस्तित्वच संकटात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर उभ्या राहिलेल्या या चळवळीची ओळख धूसर होत चालली आहे. या समाजाच्या मागण्या, भावना, प्रश्न ऐकले जात नाहीत. ऐकले गेले तरी त्यावर कृती होईल याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत रिपब्लिकन आयडेंटिटी-म्हणजेच स्वतंत्र विचार, संघटित कृती आणि सामाजिक परिवर्तनाचा आत्मा
‘जेन झी’चा सहभाग वाढवणार
चळवळ पुढे नेण्यासाठी युवकांचा सहभाग अत्यंत मोलाचा असतो. नवीन संकल्पना आणि नवीन तंत्रज्ञान सहज आत्मसात करणान्या ‘जेन झींचा फेडरेशनच्या कामात सहभाग वाढण्यात येईल, रिपब्लिकन चळवळीला नवचैतन्य देण्यासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी प्रामाणिक राहण्यासाठी हा प्रयत्न आहे. नवीन नेतृत्व त्वातून निर्माण केले जाईल. विविद्य उपक्रम राबवण्यात येतील. युवकांना बाबासाहेबांच्या विचारांशी जोडण्यास मदत होईल, असेही या मान्यवरांनी सांगितले.
पुन्हा उभा करणे काळाची गरज आहे. डॉ. सुरेंद्र बोरकर म्हणाले, रिपब्लिकन फेडरेशनचे काम आता प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचत असल्याचे चित्र आहे. विविध उपक्रम, संघटना आणि जनजागृती मोहिमांमुळे आंबेडकरी समाजात नवचैतन्य निर्माण होत असून, फेडरेशनचा आधार वाढताना दिसत आहे.
लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेटीदरम्यान रिपब्लिकन फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या संकल्पना, उद्दिष्टांबाबत माहिती दिली.