नागपूर : राज्यात मागील काही दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. त्यामुळे सभांचे वेळापत्रक बदलण्याचा विचार झालेला आहे. वज्रमूठ सभा रद्द केलेल्या नाहीत. शिवसेना नेते उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे नेते यांच्याबरोबर या विषयावर चर्चा झालेली आहे, लवकरच या सभांचे फेरनियोजन केले जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. ते प्रसार माध्यमांशी नागपुरात बोलत होते.

महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजी नगर, नागपूर व मुंबई अशा तीन वज्रमूठ सभा झालेल्या आहेत. पुणे, नाशिक, कोल्हापूर अमरावती येथे पुढील सभा होणार आहेत. परंतु, मागील काही दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. त्यामुळे सभांचे वेळापत्रक बदलण्याचा विचार झालेला आहे, असे पटोले म्हणाले.

हेही वाचा – प्रवाशांचा संताप, नागपूर विमानतळावर पहाटे काय घडले?

मुंबई, महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचा डाव भाजपाचे दिल्लीतील सरकार सातत्याने करत आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, जगात मुंबई शहराला महत्त्वाचे स्थान आहे, सर्व महत्त्वाच्या आर्थिक संस्था, विविध कंपन्यांची मुख्यालये मुंबईत आहेत, मुंबईचे हे महत्त्व भाजपाच्या डोळ्यात खुपत आहे. मुंबईतील महत्त्वाची कार्यालये गुजरातला हलवून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न सातत्याने केले जात आहेत, असा आरोप पटोले यांनी केला.

हेही वाचा – गोंदिया : भाजपा प्रदेश कार्यकारिणीवर जिल्ह्यातून केवळ एक माजी खासदार व एक माजी आमदाराचीच वर्णी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष अधिवेशनासाठी आंदोलन करू

राज्यासमोरील प्रश्नांसदर्भात राज्यपाल रमेश बैस यांची काँग्रेस शिष्टमंळाने भेट घेऊन दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत, अशी विनंती करण्यात आलेली आहे. राज्याच्या हितासाठी राज्यपाल काँग्रेसच्या मागणीचा सहानुभूतीने विचार करतील अशी अपेक्षा आहे. विशेष अधिवेशन बोलावले नाही तर काँग्रेस जनतेच्या प्रश्नांसाठी राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.