लोकसत्ता टीम

नागपूर : रामटकेच्या जागा महाविकास आघाडीत काँग्रेसला सुटल्याने नाराज झालेल्या ठाकरे गटातील नाराजी उघड झाली असून या गटाचे सुरेश साखरे यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. बुधवारी ते उमेदारी अर्ज भरणार आहे.

रामटेकची जागा महाविकास आघाडीत काँग्रेससाठी सोडण्यात आली. तेथून दोनच दिवसांपूर्वी जि.प.च्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. मात्र यामुळे ठाकरे गटात नाराजी पसरली व या गटाचे सुरेश साखरे यांनी बंडाचा झेडा हाती घेतला २७ तारखेला उमेदवारी अर्ज भरणार, उद्धव ठाकरे यांनी विनंती केली तरच अर्ज मागे घेणार अशी घोषणा साखरे यांनी केली.साखरे यांच्याकडे पूर्व विदर्भातील सेनेच्या संघटनात्मक बांधणीची जबाबदारी आहे. साखरे पूर्वी बहुजन समाज पार्टीत होते. नंतर ते शिवसेनेत आले. त्यांनी उमेदवार मागे घेतली नाही तर काँग्रेसच्या उमेदवाराला फटका बसू शकतो.

आणख वाचा-अमरावती : कारचा टायर फुटून भीषण अपघात; तीन ठार, पाच जण जखमी

महायुतीत ही जागा शिंदे गटाला सुटली आहे. त्यांनी काँग्रेसमधून रविवारी शिंदे गटात दाखल झालेल्या राजू पारवे यांना उमेदवारी दिली. राजू पारवे हे काँग्रेसचे उमरेडचे आमदार होते. त्यांनी रविवारी विधानसभा सदस्यत्व व काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. या जागेवर भाजपचाही डोळा होता, त्यांच्याच आग्रहाखातर पारवे यांनी काँग्रेस सोडली. मात्र शिंदे गटाने भाजपला जागा न दिल्याने त्यांना ऐनवेळेवर भाजप ऐवजी शिंदे गटात प्रवेश करावा लागला.