लोकसत्ता टीम

यवतमाळ : शहरालगत असलेल्या डोर्ली येथून शाळेत विद्यार्थी पोहोचण्यासाठी निघालेल्या रिक्षाचा यवतमाळ शहरातील टिळकवाडी श्रोत्री रुग्णालय चौकात अपघात झाला. मोकाट श्वान आडवा आल्याने ही रिक्षा उलटली. या घटनेत दोन विद्यार्थ्यांसह रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. दोन विद्यार्थ्यांना नागरिकांच्या मदतीने सुखरूप घरी पोहोचवण्यात आले.

रिक्षामध्ये चार विद्यार्थी होते तर अपघातात गंभीर झालेले विद्यार्थी हे यवतमाळ शहरातील लोकनायक बापूजी अणे विद्यालयाचे विद्यार्थी आहेत, तर दोन विद्यार्थी शहरातील खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे विद्यार्थी आहेत.

आणखी वाचा-५०० रुपयांची ऑनलाइन खरेदी अन् बँक खात्यावर १.१८ लाखांचा डल्ला

राजवीर संतोष नेवारे, शौर्य नितेश नागदेवते अशी अपघातात गंभीर झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे दोघेही लोकनायक बापूजी अणे विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. यातील एका विद्यार्थ्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे तर दुसऱ्या विद्यार्थ्याला मार लागला आहे. सहारे नामक जखमी असलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. जखमी विद्यार्थी व रिक्षा चालकाला त्वरित जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका विद्यार्थ्याच्या पायात फॅक्चर असल्याने त्या विद्यार्थ्याला डॉक्टरांनी शस्त्रक्रिया सांगितली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच शाळेसह प्रशासनाच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याने पालकांनी काळजी व्यक्त केली आहे.