लोकसत्ता प्रतिनिधी

बदलापूरः ठाणे जिल्ह्यातील सुमारे एक कोटी नागरिकांची तहाण भागवणाऱ्या उल्हास नदीच्या प्रदुषणात दिवसेंदिवस भर पडत असून परिणामी उल्हास नदीवर पुन्हा जलपर्णीचा चादर पहायला मिळते आहे. बदलापूर शहरातून वाहणाऱ्या या उल्हास नदीच्या वालिवली जवळचे पात्र जलपर्णीने व्यापले आहे. त्यामुळे पाण्याची पातळी घटण्याची भीती व्यक्त होते आहे. दोन वर्षांपूर्वीची जिल्हा प्रशासनाची जलपर्णी मोहिम थंडावल्याने जलपर्णीने पुन्हा डोके वर काढले आहे.

power supply of Kalyan East was suddenly interrupted in early morning
उकाड्याच्या होरपळीत कल्याणमध्ये विजेचा लपंडाव, उकाड्याने नागरिक हैराण
the Meteorological Department has predicted unseasonal rain with gale force winds in Maharashtra Pune news
राज्यात दोन दिवस पावसाचे; विदर्भाला गारपिटीपासून दिलासा ?
heavy traffic in patri pool area in kalyan
कल्याण : पत्रीपुलामुळे पुन्हा मनस्ताप, आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी
space
एप्रिलमध्ये अवकाशात अपूर्व मनमोहक घडामोडींची रेलचेल; वाचा नेमकं विशेष काय..?

उल्हास नदी ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांच्या पाणी पुरवठ्यासाठी उल्हास नदी महत्वाची आहे. पुणे जिल्ह्यातल्या आंध्र धरणातून सोडले जाणारे पाणी उल्हास नदीला येऊन मिळते. हेच पाणी बदलापूर शहरात असलेल्या बॅरेज बंधाऱ्यावरून उचलले जाते. ते पाणी बदलापूर आणि अंबरनाथ शहराला पुरवते. पुढे याच नदीत बारवी धरणातून पाणी सोडले जाते. ते जांभूळ, शहाड येथे उचलले जाते आणि जिल्ह्याला पुरवले जाते. जिल्ह्यासाठी इतक्या महत्वाच्या असलेल्या या उल्हास नदीचे प्रदुषण गेल्या काही वर्षात वाढले आहे.

हेही वाचा… नंदुरबार: खांडबारा बाजारपेठेत पेटत्या ट्रॅक्टरचा थरार; चालकाची समयसुचकता

उल्हास नदीत विविध शहरे आणि गावांचे सांडपाणी सोडले जाते. काही औद्योगिक वसाहतीतून रासायनिक सांडपाणी नदी पात्रात सोडल्याचीही उदाहरणे आहेत. या सर्व प्रदुषणामुळे उल्हास नदीत जलपर्णी वाढते आहे. तीन वर्षांपूर्वी उल्हास नदीतील ही जलपर्णी काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सगुणा रूरल फाऊंडेशनला पाचारण केले होते. त्यांनी केलेल्या उपाययोजनेनंतर जलपर्णी नष्ट झाली होती. मात्र नदीत मिसळणारे सांडपाणी थांबले नाही. त्यामुळे जलपर्णीने नव्याने डोके वर काढले.

हेही वाचा… बिहारमधून महाराष्ट्रात बालकांची तस्करी; दानापूर – पुणे एक्स्प्रेसमधून ५९ बालकांसह पाच संशयित ताब्यात

जलपर्णी नष्ट करायची असल्याने नदी मिसळणारे सांडपाणी रोखणे आवश्यक आहे. मात्र हे प्रकल्प अजूनही अपूर्ण असल्याने नदी प्रदुषण सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णीचा चादर पसरली आहे. त्यामुळे नदीचे पात्र संपूर्ण हिरवे झाले आहे. यात मोठ्या प्रमाणावर कचराही अडकला आहे. त्यामुळे पाण्याची पातळी खालावण्याची भीती व्यक्त होते आहे. आधीच पाणी टंचाई आणि पावसाचा उशिराने होणारा प्रवेश यामुळे पाण्याचे नियोजन करण्यासाठी कपात करण्याची वेळ आली आहे. त्यात या जलपर्णीमुळे पाण्याची पातळी खालावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या जलपर्णीमुळे जलचरही धोक्यात आले आहेत. त्यामुळे ही जलपर्णी लवकरात लवकर हटवून कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी केली जाते आहे.