लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: जळगाव, मनमाड – भुसावळ विभाग रेल्वे पोलीस, सुरक्षा दल आणि सामाजिक संस्था यांच्या संयुक्त कारवाईमुळे दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून होणारी ५९ बालकांची तस्करी रोखण्यात यश आले आहे. भुसावळ आणि मनमाड रेल्वे स्थानकात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पाच संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून बालकांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

Pune Rainwater Harvesting Project lead by retired colonel shashikant Dallvi
गोष्ट असामान्यांची Video: पुण्यातील निवृत्त कर्नल शशिकांत दळवींचं ‘मिशन पाणी वाचवा!’
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
percentage of voting in Mumbai,
मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे शहरांतील मतदानाचा टक्का वाढणार कसा ? मतदारांचा निरुत्साह दूर करण्यावर निवडणूक आयोगाचा भर
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?

बिहारमधील दानापूरहून निघालेल्या पुणे एक्स्प्रेसमधून बालकांची तस्करी होत असल्याची माहिती एका सामाजिक संस्थेने रेल्वे पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे भुसावळ विभागाचे रेल्वे पोलीस, सुरक्षा दल, लोहमार्ग पोलीस यांनी एक्स्प्रेस मंगळवारी भुसावळ स्थानकात येताच तपासणी करण्यास सुरूवात केली. वेगवेगळ्या डब्यांमध्ये बसलेल्या आठ ते १५ वयोगटातील ३० मुलांना भुसावळ येथे रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने ताब्यात घेतले. या सर्व मुलांना स्थानकात उतरवून त्यांच्या सोबत असलेल्या एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर भुसावळ ते मनमाड दरम्यान एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांकडून पुन्हा मनमाडपर्यंत रेल्वेत शोध मोहीम करण्यात आली. यावेळी गाडीत २९ मुले आणि चार संशयित हाती लागले. त्यांना मनमाड रेल्वे स्थानकात उतरविण्यात आले.

हेही वाचा… शासन-सार्वजनिक-खासगी भागीदारीवर नाशिकचा विकास शक्य; ‘मी नाशिककर’तर्फे भविष्यकालीन आराखडा सादर

भुसावळ येथे मिळालेल्या ३० बालकांना जळगाव येथील बालसुधार गृहात पाठविण्यात आलमनमाडहून रवाना करण्यात आलेली २९ बालके बुधवारी सकाळी नाशिक येथे आली. त्यांना बालकल्याण समितीपुढे उभे करण्यात आले. त्यांचे समुपदेशन करुन नेमके काय झाले, याची माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

हेही वाचा… अवाजवी घरपट्टीने धुळेकर हैराण; भाजप उपमहापौरांचा घरचा आहेर

याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातून सांगली येथे या मुलांना नेण्यात येणार होते, अशी माहिती चौकशीत या संशयितांनी दिली आहे. कोणाला संशय येऊ नये म्हणून मुलांना मदरशाचा गणवेश परिधान करण्यात आला होता. मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या ५९ मुलांच्या पालकांची माहिती काढली जात असून, ओळख पटविल्यानंतर संबंधित बालकांना पुढील आठवड्यापर्यंत ताब्यात देण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या बालकांशी संवाद साधण्यात भाषेची अडचण आली. खाणाखूणा तसेच अन्य लोकांच्या मदतीने बालकांशी संवाद साधण्यात येत आहे. बालके घाबरली असून बोलण्यास कचरत असल्याचे सांगण्यात आले.

रेल्वे पोलिसांनी भुसावळ आणि मनमाड येथे केलेल्या कारवाईत ५९ बालके सापडली आहेत. नाशिक येथे आलेल्या या बालकांशी बाल कल्याण समितीचे अधिकारी, सदस्य संवाद साधत आहेत. हा प्रकार कसा घडला, कारणे आदींची माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. – सुवर्णा वाघ (रेल्वे पोलीस, नाशिक)