नागपूर : सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन जाणारी अपघातग्रस्त बस आणि या बसला नियमबाह्य पीयूसी देणाऱ्या केंद्राची नोंदणी रद्द करण्याबाबत गुरुवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) नोटीस बजावण्यात आली.

सरस्वती माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मंगळवारी सहलीसाठी घेऊन जाणारी बस हिंगणा परिसरात उलटल्याने एक विद्यार्थिनी जागीच ठार तर आठ विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. रस्त्यावरून बस खाली आल्यावर ब्रेक दाबण्यात आले, बसचे दोन्ही आपत्कालीन द्वार बंद होते, या बाबी आरटीओ अधिकाऱ्यांच्या निरीक्षणातून समोर आल्या. त्यानंतर नागपूर ग्रामीण आरटीओकडून बस मालकाला बसची नोंदणी कायमची रद्द का करण्यात येऊ नये, म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून संबंधित पीयूसी चालकालाही कारणे दाखवा नोटीस बजावली गेली. दोघांनीही गंभीर चुका केल्याचे आरटीओच्या निरीक्षणात पुढे आले आहे. त्यामुळे त्यांचे उत्तर आल्यावर दोघांचेही परवाने रद्द करण्याची तयारी आरटीओ अधिकाऱ्यांनी केली आहे.

traffic system in Swargate area will changed on Tuesday November 19 and Wednesday November 20 pune
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Rakesh Mutha hair burnt in kalyan west
कार्यकर्त्यांचा अतिउत्साह उमेदवाराच्या अंगलट आला; फटाक्यांच्या ठिणगीमुळे उमेदवाराचे केस जळाले
Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
farmer suicide sharad pawar
राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय गंभीर – शरद पवार
campaign will stop today
प्रचारतोफा आज थंडावणार, निवडणूक आयोगाची ‘छुप्या प्रचारा’वर नजर
supriya sule criticizes mahayuti
पूल, इमारती म्हणजे विकास नव्हे! सुप्रिया सुळे यांनी पक्षातील फुटिरांना फटकारले

हेही वाचा…सावधान ! सरकारी पाहुणे येत आहेत, सरबराईच्या तयारीला लागा …

पीयूसीचे यंत्रही जप्त करा

अपघातग्रस्त बसला पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरातील एका केंद्रातून पीयूसी दिली गेली होती. यावेळी ही बस येथे तपासणीला आल्याचे दर्शवले गेले. त्यामुळे या केंद्राची नोंदणी रद्द करून पीयूसी यंत्रही जप्त करावे, असे पत्र नागपूर ग्रामीण आरटीओकडून पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला देण्यात आले आहे. यंत्र जप्त न केल्यास केंद्रचालक दुसऱ्या नावाने पुन्हा केंद्र सुरू करू शकतो, अशी शंका आरटीओ अधिकारी व्यक्त करत आहेत.

हेही वाचा…खळबळजनक! मोठ्या भावाच्या बायकोशी जुळले सूत, कुऱ्हाडीने…

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीला आरटीओकडून पत्र

अपघात झालेल्या रस्त्यावर कठडे योग्यरित्या लागले नसून त्याऐवजी भिंत उभारणे आवश्यक आहे. रस्त्याच्या वळणावर ब्लिंकर लावणे आवश्यक आहे. वळणावर गतिरोधक, रमलरस्ट्रिप बसवणे आवश्यक आहे. वळणमार्गात भविष्यात सुधारणा आवश्यक आहेत. रात्री रस्त्याच्या शेजारी ब्लिंकर लाईटची गरज असून तातडीने सुधारणा न झाल्यास अपघाताचा धोका असल्याचे पत्र नागपूर ग्रामीण आरटीओने जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या सदस्य सचिवांना दिले आहे.

प्रकरण काय?

नागपुरातील सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन निगलेल्या बसला हिंगणा परिसरात अपघात झाला होता. त्यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर अनेक जण जळमी झाले. या बसला परवाना नसल्यासह पीयूसी अपघातानंतर काढल्याचे पुढे आहे होते. बसमध्ये अनेक नियमांचा भंग झाला होता. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभाग नागपूर ग्रामीण, उपप्रादेशिक परिवहन विभाग पूर्व नागपूर कार्यालयाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे.