scorecardresearch

Premium

भंडारा : खळबळजनक! जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिकाच्या मोबाईलवर प्रश्नांच्या उत्तरांचा ‘स्क्रीनशॉट’, कोतवाल भरती परीक्षा

भंडारा तहसीलमध्ये कोतवाल भरती परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा स्क्रीनशॉट सर्वप्रथम जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिकाच्या मोबाईलवर आल्यानंतर तहसीलदारांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चारजणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Kotwal Recruitment Bhandara
भंडारा : खळबळजनक! जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिकाच्या मोबाईलवर प्रश्नांच्या उत्तरांचा 'स्क्रीनशॉट', कोतवाल भरती परीक्षा (छायाचित्र – प्रातिनिधिक छायाचित्र/लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

भंडारा : भंडारा तहसीलमध्ये कोतवाल भरती परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा स्क्रीनशॉट सर्वप्रथम जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिकाच्या मोबाईलवर आल्यानंतर तहसीलदारांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चारजणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यात तीन आरोपींना अटक केली असून त्यापैकी एक फरार आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये परीक्षार्थी चेतन बावनकुळे (वय १९), चेतनचा चुलत भाऊ राहुल बावनकुळे आणि अरविंद सुनील घरडे, सर्व रा. परसोडी यांचा समावेश आहे. अरविंद धरणगाव, रा. बेला हा फरार असल्याची माहिती आहे. माहितीनुसार, भंडारा तहसीलमधील महसूल विभाग कोतवाल पदाच्या भरती २०२३ प्रक्रियेअंतर्गत २८ मे रोजी लाल बहादूर शास्त्री शाळा केंद्रावर सकाळी ११ ते १२ या वेळेत लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षा सुरू झाल्याच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे लिपिक निमेश गेडाम यांच्या मोबाईलवर प्रश्नांच्या उत्तरांचा स्क्रीनशॉट प्राप्त झाला, त्यानंतर भंडाराचे तहसीलदार अरविंद हिंगे यांनी गोपनीय पद्धतीने या प्रकरणाचा तपास सुरू केला.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
hunger strike, Rohit Patil, Health deteriorated, sangli
उपोषण सुरु करताच रोहित पाटलांची प्रकृती खालावली

हेही वाचा – चंद्रपूर: ताडोबात ‘बॅटरी’वरील ‘जिप्सी’मधून पर्यटन; प्रदूषण टाळण्यासाठी व्यवस्थापनाचा निर्णय; चाचणी सुरू

आपल्या साथीदारांच्या मदतीने नियोजन करून परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मोबाईलद्वारे इतर उमेदवारांना सांगून परीक्षेत फसवणूक करण्यास प्रवृत्त केल्याचे समोर आले. सरकारी नोकरी मिळविण्यासाठी शासनाची फसवणूक केल्याची लेखी तक्रार तहसीलदार हिंगे यांनी भंडारा पोलीस ठाण्यात दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी चारजणांविरुद्ध आयपीसी आणि कॉपी प्रतिबंध कायद्याचे कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील करीत आहेत. फरार असलेल्या आरोपीच्या शोधार्थ पथक नेमण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Screenshot of answers of questions asked in kotwal recruitment exam in bhandara tehsil on clerk mobile ksn 82 ssb

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×