लोकसता टीम

नागपूर : रेल्वेत विकला जाणारा चहा शौचालयातील पाण्याचा वापर करून तयार केला जात असल्याची चित्रफीत प्रसारित झाली आहे. रेल्वेतून प्रवास करीत असताना अनधिकृत विक्रेत्यांकडून प्रवाशांनी चहा घेऊ नयेत, असे आवाहन भारतीय यात्री केंद्राने प्रवाशांना केले आहे. रेल्वेतील चहा विक्रेते शौचालयातील पाण्याचा वापर करून थर्मोसेसमधून चहाची विक्री करीत असल्याचे चित्रफीत प्रसारित झाली आहे. तेव्हा प्रवाशांनी अशा विक्रेत्यांकडून चहा घेतल्यानंतर आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती वाढली आहे.

मुख्यत: यापूर्वी यशवंतपूर-गोरखपूर एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी विकत घेतलेल्या अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली होती. रेल्वे प्रवासातील ९० हून अधिक प्रवासी यामुळे आजारी पडले होते. याशिवाय नागपूर मुंबई-नागपूर दुरांतोची अचानक तपासणी करण्यात आली. त्यावेळी सुध्दा तपासणीत अनधिकृत विक्रेते पकडण्यात आले. एवढी गंभीर घटना घडल्यानंतरही मुदत झालेल्या झालेल्या खाद्यपदार्थांच्या वस्तू रेल्वेतून विक्री होत आहे.

आणखी वाचा-नागपुरात तृतीयपंथीयांकडून सर्वसामान्यांची लूट! मुलगा जन्मल्यास सोन्याची साखळी…

अनेक रेल्वे गाड्यांमध्ये खाद्यपदार्थ विकणार्‍या विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. यावर रेल्वेकडून होणारी कारवाई नाममात्र असल्याने विक्रेत्यांची हिंमत वाढली आहे. रेल्वेतून प्रवास करीत असलेल्या सर्व प्रवाशांनी आपल्या घरातील अन्न पदार्थ आणि शीतपेये घेऊन प्रवास करण्याचे आवाहन भारतीय यात्री केंद्राने केले आहे.

प्रवाशांचे आरोग्य धोक्यात

मुख्यत: प्रवासात रेल्वेतील विक्रेते प्रवाशांना शिळे अन्न देत असल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अवैध विक्रेत्यांवर कारवाई केल्याशिवाय प्रवाशांना चांगले खाद्यपदार्थ किंवा चहा विस्कीट मिळणार नाही, त्यामुळे रेल्वे अधिकार्‍यांनी अवैध विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ही चित्रफीत २०१८ ची सिकंदराबाद स्थानकावरील चारमिनार एक्सप्रेसमधील असल्याचे समजते.