नागपूर : पंधरा वर्षांच्या मुलीचे बापाने वारंवार लैंगिक शोषण केले. बापाच्या तावडीतून तिची सुटका व्हावी म्हणून प्रियकराने तिला पळवून नेले. मात्र, दोन महिन्यांची गर्भवती असलेल्या प्रेयसीने आता प्रियकराविरुद्ध बलात्कार केल्याची तक्रार दिली. त्यामुळे वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रियकराला अटक केली. कैलास राजकुमार अडमाचे (२५, आठवा मैल, वाडी) असे आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा – गोंदिया : ट्रकने मुलाला चिरडले, संतप्त जमावाने ट्रक पेटवला; परिसरात तणाव

हेही वाच – राजकीय नेत्यांचे वक्तव्य अज्ञानातून, न्यायालयाच्या ताशेऱ्यांवर फडणवीसांची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी टिना (काल्पनिक नाव) ही दहावीत असतानाच तिच्या दारुड्या बापाची वाईट नजर तिच्यावर पडली. घरी कुणी नसताना बापाने तिच्यावर वारंवार लैंगिक शोषण करणे सुरू केले. बापाच्या अत्याचाराला ती कंटाळली होती. यादरम्यान, तिचे गावातील कैलास अडमाचे या तरुणाशी सूत जुळले. ती कैलाससोबत पळून नागपुरात आली. दरम्यान, ती गर्भवती झाल्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या. गवंडी काम करणाऱ्या कैलासने लग्न न करताच वडील म्हणून बाळाला नाव दिले. सध्या टिना १७ वर्षांची असून ती पुन्हा गर्भवती झाली. तिने गर्भपात करण्याचे ठरवले. मात्र, डॉक्टरांनी तिचे आधारकार्ड तपासले असता ती अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. त्यामुळे डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून कैलासविरुद्ध बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला.