नागपूर: शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये रोज नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. यात आता अधिकाऱ्यांनंतर संस्थाचालकांना अटक केली जात आहे. शनिवारी विशेष तपास पथकाने मोठी कारवाई केली आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यात शनिवारी विठ्ठल रुक्मिणी शिक्षण संस्थेचे संस्थाचालक दिलीप धोटे यांना विशेष तपास पथकाने अटक केली. धोटे यांनी १५ शिक्षकांचे बनावट शालार्थ आयडी तयार करून त्यांना नोकरी दिल्याचा आरोप आहे. तसेच प्रत्येकाकडून त्यांनी १५ लाख रुपये घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याआधी पोलिसांनी चरण चेटुले (६३, भंडारा) यांना अटक केली होती. आता दिलीप धोटे यांची यांना अटक करण्यात आली आहे. धोटे यांनी १५ शिक्षकांची नियुक्ती केल्याचा आरोप आहे. यासोबतच त्यांनी राजाबक्षा येथील नवयुवक प्राथमिक शाळेत या शिक्षकांना नियुक्ती दिली. या शिक्षकांचे नियुक्ती विठ्ठल रुक्मिणी संस्थेत झाली असली तरी त्यांना वेगळयाच शाळेत नोकरी देण्यात आली. एसआयटी प्रमुख सुनीता मेश्राम यांनी सर्व शिक्षकांना बोलावून त्यांचा जबाब नोंदवला. यात शिक्षकांनी १५ लाख रुपये धोटे यांना दिल्याची कबुली दिली. सोबतच त्यांना मिळत असलेल्या वेतनातून काही पैसे धोटे ठेवत असल्याचा आरोप केला आहे.

धोटे यांनी १५ शिक्षकांचे बनावट शालार्थ आयडी तयार करून नियुक्ती दिल्याचा आरोप आहे. प्रत्येकाकडून १५ लाख रुपये घेतल्याची कबुली शिक्षकांनी दिली आहे. या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुनीता मेश्राम, सहाय्यक पोलीस आयुक्त, एसआयटी प्रमुख.