लोकसत्ता टीम

वाशिम: पंचशील नगर येथील रोजमजुरी करून पोटाची खळगी भरणा-या माधव इंगोले या कष्टकरी कामगाराचा मुलगा शांतनू हा राष्ट्रीय स्तरावर पुणे येथील बालेवाडी स्टेडीयम वर धावण्याच्या शर्यतीत प्रथम आला असून त्याची आता नेपाळ येथे आंतरराष्ट्रीय पातळीवर होणा-या स्पर्धेत निवड झाली आहे.

शांतनू हा गरीब घराचा असून धावण्याच्या स्पर्धेसाठी अविरत सराव करतो. पुणे येथील बालेवाडी येथे ऑल इंडिया नॅशनल चॅम्पियन शिप मध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम आला. झोपडपट्टीत राहणा-या लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असे शेकडो हिरे या वस्तीत आहेत दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत जिल्ह्यात पहिला येणारा मुलगा देखील याच वस्तीतला तर वैद्यकीय क्षेत्रात एम.बी.बी.एस.होणारा देखील याच वस्तीतला हिरा आहे.

हेही वाचा… अमरावती: अवकाळी पावसाने ८ हजार हेक्‍टरमधील पिकांचे नुकसान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी शिक्षक सुनील कांबळे, दिपक डोंगरदिवे, सुरज खडसे यांनी मार्गदर्शन केले व सामाजिक कार्यकर्ते पी.एस. खंदारे यांच्या हस्ते बुध्द पौर्णिमा च्या दिवशी छोटेखानी सत्कार करण्यात आला. या वेळी पंचशील नगर वाशिम येथील महिला पुरूष मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.