नागपूर: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे प्रथम बेस्ट या मुंबईतील संस्थेसाठी आणि मुंबई महापालिकेच्या निवडणूकीसाठी एकत्र येण्याचे संकेत आहे. या एकत्र येण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवा नेते रोहित पवार यांनी महत्वाचे भाष्य केले . त्याबाबत आपण जाणून घेऊ या.
बेस्ट हा मुंबईचा विषय आहे. ही अतिशय महत्त्वाची संस्था आहे. बेस्टमध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार होत आहे आणि सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ही महत्वाची संस्था अडचणीत येऊ नये, त्या दृष्टीने जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या भावांचे पक्ष व कुटुंब एकत्र येत असेल तर त्याच्या स्वागत केले पाहिजे. हे एकत्रिकरण आता केवळ बेस्ट पुरते आहे. पुढे मुंबई महापालिकेत काय होते, ते पाहावे लागेल. कॉमन अजेंडा घेऊन दोघ भाऊ एकत्र येत असतील तर काही वावगे नाही, असेही आमदार रोहित पवार म्हणाले.
महिला आयोगाला डोक नाही, त्यांच्या अध्यक्षांनीच…
कोथरूडमध्ये मातंग समाजाच्या मुलीवर अन्याय झाला आहे. कुठेही सर्च वॉरंट नसताना घरी आणि ऑफिसला जाऊन त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न चालला आहे. मुलींच्या घरी पोलीस गेल्यावर आजूबाजूच्या लोकांच्या काय वाटणार, वॉरंट नसताना ताब्यात घेतले, तपासणीदरम्यान वेगळ्या पद्धतीने वाद निर्माण झाल्याचे आपण बघितले आहे. मुलींचे नाव पोलिसांनी प्रसिद्ध केले नाही, आम्ही प्रसिद्ध केले नाही मात्र महिला आयोगाने त्या मुलींचे नाव प्रसिद्ध केले आहे. हा गुन्हा आहे मग महिला आयोगाच्या बाबतीत काय केले जातेय. महिला आयोगाला डोकं नाही आणि त्या आयोगाच्या अध्यक्षांनी, मुलींचे नाव प्रसिद्ध करून बदनामी करणे योग्य नाही, आयोगालाही ते योग्य दिसत नाही आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही, असेही रोहित पवार म्हणाले.
मुंबईची निवडणूक बघून मराठीचा वाद केला जातोय…
राज्यातील समाजात वाद निर्माण केला जातोय. मुंबईची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठी- अमराठीचा वाद केला जातोय. हा राजकीय पोळी भाजून घ्यायचा भाजपच्या दृष्टिकोन आहे. मंडल आयोग महाराष्ट्रात पहिल्यांदा लागू करण्यात आला होता. राजकीय आरक्षणासाठी गोष्टी असेल त्याचा भाजपने विरोध केला होता. मात्र सध्याचे जे विविध प्रश्न आहेत ते बाजूला राहिले आहेत आणि निवडणुका या जातीयवाद भाषावाद धर्मावादावर लढल्या जात आहे. आज मंडल यात्रा आमच्या पक्षाच्या ओबीसी विभागातर्फे करण्यात येत आहे, असेही रोहित पवार म्हणाले.