नागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विरोधकांनी भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या सरकारला श्रीखंडाचे डबे दाखवून राज्य सरकारचा तीव्र निषेध केला. या प्रसंगी द्या खोके, भूखंड ओकेसह इतर घोषणा, निदर्शने करून विरोधकांनी सर्वांचे लक्ष वेधले. गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला.

राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाओ, दिल्लीचे मिंधे एकनाथ शिंदे, ५० खोके भूखंड ओके, द्या खोके भूखंड ओके, राज्यपालांचे करायचे काय खाली डोके वर पाय, मुख्यमंत्री राजीनामा द्या अशा घोषणांनी विधान भवन परिसर आजही दणाणून सोडला. मिंधे सरकार भूखंड घोटाळ्या – बाबत चौकशी करण्यास तयार नसल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे.

हेही वाचा: सारथ्य समृद्धीवरचे आणि राजकारणाचे: शिंदेसाठी एक सुसह्य, दुसरे हादरे देणारेबातमी वाचा सविस्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापुरुषांचा अपमान करणारे राज्यपाल कोश्यारी यांच्यावर कोणतीही कारवाई न करता मिंधे सरकार मूग गिळून बसले आहे, असा आरोप करीत आंदोलन केले. या आंदोलनात अजित पवार, अंबादास दानवे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आदित्य ठाकरे, छगन भुजबळ, राजेश टोपे, सुनील केदार, सुनील प्रभू, रोहित पवार, आदित्य ठाकरे, जयंत पाटील, विकास ठाकरे आदी सहभागी होते.