scorecardresearch

अमरावती : आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांचा हल्लाबोल; ‘पन्नास खोके एकदम ओके’च्या घोषणा

वाहनाच्या ताफ्यावर हल्लाबोल करीत ‘पन्नास खोके एकदम ओके’च्या घोषणा दिल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली.

अमरावती : आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांचा हल्लाबोल; ‘पन्नास खोके एकदम ओके’च्या घोषणा
आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांचा हल्लाबोल

शिवसेनेतून बंडखोरी करीत शिंदे गटात सर्वात शेवटी आलेले आमदार संतोष बांगर आज सायंकाळी अंजनगाव सुर्जी येथील मठातून दर्शन करून निघाले असता शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर हल्लाबोल करीत ‘पन्नास खोके एकदम ओके’च्या घोषणा दिल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली.

हेही वाचा >>>चंद्रपूर : घरी न सांगता पोहायला जाण्याचा बेत जीवावर बेतला, इरई नदीत बुडून दोन मित्रांचा मृत्यू

आ. बांगर हे आज अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठात दर्शनाकरिता आल्याची कुणकुण तालुक्यातील शिवसैनिकांना लागली आणि शहरासह ग्रामीण भागातील शिवसैनिक लाला चौकात गोळा झाले. सहा वाजताच्या सुमारास आ. बांगर यांच्या वाहनाचा ताफा मठाबाहेर पडताच शिवसैनिकांनी ‘पन्नास खोके एकदम ओके’चे नारे देत त्यांच्या गाडीवर हातमुक्क्यांनी मारत घोषणाबाजी केली. यावेळी आ. बांगर यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकांनाही काही वेळ काय होत आहे हे कळलेच नाही. या घटनेने लाला चौकात एकच खळबळ उडाली होती.

हेही वाचा >>> अमरावतीच्‍या जिल्‍हा स्‍त्री रुग्‍णालयात आग; धुरामुळे चिमुकल्‍यांची प्रकृती गंभीर

आ. बांगर हे शिंदे गटात सहभागी होणारे शेवटचे आमदार होते. एकनाथ शिंदेनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय बांगर यांनी घेतला होता. मात्र अचानक दुसऱ्या दिवशी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत दिसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. शिवसैनिकांच्या रोषाचा सामना बांगर यांना आज करावा लागला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या