बुलढाणा: तलवारीने केक कापणे गुन्हा नव्हे, असे अजब वक्तव्य बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. पोलीस विभागाने मागील काळात अशाप्रकरणी केलेली कारवाई चुकीची असल्याचा पूरक दावाही त्यांनी केला. आपल्या मुलाच्या वाढदिवसाला तलवारीने केक कापण्याची आमदार गायकवाड यांची चित्रफीत वेगाने व्हायरल होत आहे.

याबाबत संजय गायकवाड म्हणाले की, तलवारीने वाढदिवसाचा केक कापणे गुन्हा नाही, असे आपले ठाम मत आहे. पोलीस विभागाने अशा प्रकरणात संबंधित लोकांवर गुन्हे दाखल केले. मात्र ही कारवाई योग्य नाही असे मला वाटते. उच्च न्यायालयात पोलिसांची अशी कारवाई ‘क्रश’ होऊ शकते.

हेही वाचा : Video : आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीने कापला केक; मुलाचा वाढदिवस जल्लोषात

तलवार शौर्याचे प्रतीक मानली जाते. तलवारीचा वापर कोणत्या उद्धेशाने केला हे महत्वाचे आहे. तलवारीचा वापर कोणाला मारण्यासाठी केला, धमकाविण्यासाठी केला किंवा दंगलीमध्ये केला असेल तर शंभर टक्के गुन्हा दाखल होऊ शकतो. आता, काही कार्यक्रमात मोठ्या राजकीय पुढाऱ्यांना तलवारी भेट दिल्या जातात. तलवार देण्यात आलेला नेता ती तलवार जनतेला दाखवतो. ते काही मारण्यासाठी दाखवितात का, असा प्रति प्रश्न गायकवाड यांनी केला.

हेही वाचा : लोकसभेचा पराभव जिव्हारी…फडणवीस, बावनकुळेंचा नागपुरात तळ…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तलवार दाखवण्याने जर गुन्हा होतो तर पोलीस संचलन (परेड)मध्ये एखादा अधिकारी हजारोच्या गर्दीला तलवार दाखवतो ते काय असते? असेच असेल तर ऑलम्पिकमधील पिस्तूलबाजी, तलवारबाजी आणि धनुर्विद्या हे क्रीडा प्रकार बंद करावे लागतील, असेही गायकवाड म्हणाले.