चंद्रपूर : महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ‘एक सही संतापाची’ हे अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानाला चंद्रपूर जिल्ह्यात तथा शहरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. चंद्रपूर येथील आझाद बगीचा, गांधी चौक, जनता महाविद्यालय चौकात मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश शास्त्रकार यांच्या नेतृत्वात या उपक्रमाला शनिवारी सुरुवात करण्यात आली. या उपक्रमात शाळकरी मुले, तरुणांसह वृद्धसुद्धा सहभाग घेत असल्याचे दिसून आले.

हेही वाचा – अमरावती: गूढ उलगडले! अल्पवयीन युवतीची प्रेमप्रकरणातून हत्‍या

महाराष्ट्राच्या राज्यात मागील काही वर्षांचा विचार केल्यास मोठ्या उलथापालथ झाल्या. यासंदर्भात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगत आहेत. जनसामान्यांपासून ते वृद्धांचाही या चर्चेत सहभाग आहे. भाजपा, शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट या परस्पर विरोधी विचारांची युती जनतेला पटलेली नाही, भाजपाचे फोडाफोडीचे राजकारण मतदारांना रुजलेले नाही. त्यामुळे लोक संताप व्यक्त करून स्वाक्षरी करीत आहेत.

हेही वाचा – प्रयोगशील शेतकरी व कृषी पदवीधर ठरताहेत प्रेरणादायी! कृषी विद्यापीठाचा ‘आयडॉल’ उपक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण व ज्येष्ठही आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एक सही संतापाची हा अनोख्या उपक्रमाला लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमात ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, तरुण सहभाग घेत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर रोष व्यक्त करीत आहेत. हे अभियान राबवताना यावेळी मनसेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.