लोकसत्ता टीम

वर्धा: वीस मार्च हा जागतिक चिमणी दिन म्हणून पाळल्या जातो. बालपणापासून संगत असणाऱ्या चिऊताईची संख्या रोडावत असल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षीप्रेमी चिंतीत आहे. या गोड चिवचिवाट करणाऱ्या पक्ष्यांचे जतन व संवर्धन कारण्यहेतूने निसर्गसाथी फाऊंडेशनतर्फे काही उपक्रम हाती घेण्यात येत आहे.

आणखी वाचा- Video: ‘सूर्या’ वाघ झाला गंभीर जखमी, चालताही येईना…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जागतिक चिमणी दिनानिमित्त सतरा ते वीस मार्चदरम्यान हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील चिमण्यांची मोजदाद होत आहे. नागरिकांनी तीनपैकी कोणत्याही एका दिवशी सकाळी सहा ते नऊ व दुपारी चार ते सहा या वेळेत परिसरातील चिमण्या मोजाव्या, तशी नोंद ऑनलाईन करण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. या गणनेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकास प्रमाणपत्र मिळणार असून चिमणी वाचवा मोहीम फत्ते करण्याची विनंती आहे.