नागपूर : कांग्रेसने मतांसाठी हिंदू दहशतवाद शब्द आणला. ९० च्या दशकात इस्लाम दहशतवाद जगभर होता भारतातच नव्हे तर अमेरिका, युरोपमध्ये दहशतवादी आपल्या कारवाया करीत होते. काँग्रेसने आपली वोट बँक सुरक्षित करान्यासाठी, ती नाराज होऊ नये म्हणून भगवा दहशतवाद आणि हिंदू टेररिस्ट हा शब्द निर्माण केला परंतु न्यायालयाच्या निकालानंतर त्यांचे मनसुबे उधळले गेले आहेत, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली. ते आज नागपुरात माध्यम प्रतिनिधी शी बोलत होते.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केले तसेच ते विधानसभेत ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाले. त्यानंतर त्यांची मंत्रिमंडळातून उचलबांगडी होणार अशी चर्चा होती. परंतु त्यांचे कृषी खाते बदलून चक्क क्रीडा मंत्री बनवण्यात आले.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सभागृहात जी काही घटना घडली त्या घटनेनंतर एक मोठा रोष होता त्या संदर्भात अजित पवार आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चेअंती हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून त्यांचा खातं हे बदललेला आहे त्यांना दुसरे खाते दिले आहे आणि कृषी खात हे दत्ता भरणे देण्यात आले. आता मंत्रिमंडळात दुसरा कुठलाही बदल या ठिकाणी होईल अशी चर्चा नाही.
अशी गैरवर्तणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितले आहे, की आम्ही खपवून घेणार नाही आणि याच्यावर कारवाई होईल. जनतेची सेवा करण्यासाठी सत्तेत आलो आहे. आणि ती करत असताना आम्ही काय बोलतो, तुमचा व्यवहार कसा आहे, हे सर्व जनता बघत असते. त्यामुळे त्यावर अंकुश असणे आवश्यक आहे.
माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तीन वेळा माझी भेट घेतलेली आहे आणि वेगवेगळ्या कारणाने भेट घेतलेली आहे. कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झालेली नाही. मंत्रिमंडळाची चर्चा धनंजय मुंडे यांच्या स्तरावर होत नाही. मंत्रिमंडळाची चर्चा मी अजित पवार आणि एकनाथराव शिंदे करतो, असे सांगून मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाबाबतची शक्यता फेटाळली.