scorecardresearch

Premium

हिवाळी अधिवेशनासाठी विशेष रेल्वेगाडी ‘या’ दिवशी धावणार, जाणून घ्या थांबे आणि वेळ…

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होत असून २० डिसेंबर पर्यंत चालणार आहे. त्यासाठी नागपूरकडे येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

special train will run for the winter session
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई ते नागपूर विशेष रेल्वेगाडी चालवणार आहे.(फोटो- संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता टीम

नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होत असून २० डिसेंबर पर्यंत चालणार आहे. त्यासाठी नागपूरकडे येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई ते नागपूर विशेष रेल्वेगाडी चालवणार आहे.

Railway mega block Many trains will be cancelled between Pune and Lonavala
रेल्वेचा मेगा ब्लॉक! पुणे -लोणावळा दरम्यान अनेक गाड्या रद्द राहणार 
protestor Morshi committed suicide
अमरावती : उपोषण मंडपातच आंदोलकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या
Big decision of railways Lonavala local will now run in afternoon as well
रेल्वेचा मोठा निर्णय : लोणावळा लोकल आता दुपारीही धावणार; जाणून घ्या वेळा…
mega block on konkan railway due to maintenance
कोकण रेल्वेवर ब्लॉक; तीन रेल्वेगाड्यावर परिणाम

ही विशेष गाडी दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबणार आहे. या गाडीला १७ डब्बे असातील. त्यात एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान आणि ५ सामान्य द्वितीय श्रेणी डबे राहतील.

आणखी वाचा-यवतमाळ : देशी बनावटीचे पिस्टल सहज होतात उपलब्ध! ११ महिन्यांत १६ कारवाया

०२१०३ सुपरफास्ट विशेष गाडी शनिवार २ डिसेंबरला सीएसएमटी, मुंबई येथून रात्री ८ वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी दुपारी ३.३२ वाजता पोहोचेल. त्यासाठी आज, गुरुवारपासून तिकिट विक्रीला सुरुवात झाली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Special train will run for the winter session rbt 74 mrj

First published on: 30-11-2023 at 13:25 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×