अकोला : सणासुदीच्या काळातील गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. विदर्भाला मुंबई, पुण्याशी जोडणाऱ्या विशेष गाड्या २८ ऑक्टोबरला सोडल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेकडून २८ ऑक्टोबरला एकूण २३ विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. त्यातील १४ विशेष गाड्या भुसावळ विभागातून धावतील. गाडी क्र. ०१०११ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२० वाजता सुटेल.

या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबा राहील. गाडी क्र. ०१४०३ पुणे – अमरावती विशेष पुणे येथून रात्री १९.५५ वाजता सुटेल. या गाडीला दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापुर आणि बडनेरा येथे थांबा आहे. चार वातानुकूलित तृतीय श्रेणी, सहा शयनयान, सहा सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन, अशी गाडीची संरचना आहे.

गाडी क्र. ०१४०१ पुणे – नागपूर विशेष पुणे येथून रात्री २०.३० वाजता सुटेल. या गाडीला दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापुर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबा आहे. गाडी क्र. ०१२०२ हडपसर – नागपूर विशेष हडपसर येथून दुपारी १५.५० वाजता सुटेल. या गाडीला ऊरळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबा आहे. गाडी क्र. ०१४१० नागपूर – पुणे विशेष नागपूर येथून १६.१० वाजता सुटेल. या गाडीला वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यनगर आणि दौंड कॉर्ड लाईन येथे थांबा राहील.

गाडी क्र. ०१०१२ नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष नागपूर येथून २२.१० वाजता सुटेल. ही गाडी वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे आणि दादर येथे थांबणार आहे. या विशेष गाड्यांपुढे गर्दीच्या काळात प्रवाशांची सुविधा होणाार आहे.