गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील सालेकसात महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांच्या हस्ते धर्मवीर फ्लड लाईट प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन रविवारी रात्री करण्यात आले. गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा सालेकसा भागात क्रिकेटचा जल्लोष आणि त्यात ही राज्यातील राज्यमंत्री महोदयांचा सहभाग लाभला.
सालेकसात क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केल्यानंतर जयस्वाल यांनी उद्घाटन सामन्यातील खेळाडूंची ओळख केल्यानंतर पहिला सामना सुरू होण्यापूर्वी मैदानात उतरत क्रिकेट खेळाचा आनंद घेतला. त्यांच्या बॅटिंगला उपस्थित इतर खेळाडू व पाहुण्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. मंत्री महोदयांनी मनसोक्त चेंडू टोलवत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. नक्षलग्रस्त भागात खेळाच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल अशी आशा त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली.
सालेकसा तालुक्यात रविवार ४ मे रोजी शिवसेना (शिंदे गट) आणि एसएसएस क्रिकेट क्लबद्वारे आयोजित धर्मवीर प्रीमियर लीग ३.० रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा चे उद्घाटन जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना गोंदिया जिल्हाप्रमुख सुरेंद्र नायडू, माजी आमदार सहस्राम कोरोटे, महिला जिल्हा प्रमुख शिवसेना, माया शिवणकर, अमित गिते, योगिता, तमिल टेंभरे, संजू देशकर,तेजस्वी बास, विजय नागपुरे,अनिलभाऊ सोनकनवरे,अतुल चौहान ,मायकल मेश्राम, अर्जुनसिंग बैस, रमेश फंडे उपस्थित होते.
एक वेगळाच आनंद
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर मी दुसऱ्यांदाच सालेकसा येथे आलो आहे. धर्मवीर क्रिकेट प्रीमियर लीग च्या आयोजनाच्या उद्घाटन प्रसंगी येण्याच्या सौभाग्य मला प्राप्त झाले त्यासाठी आयोजकांचा मी आभारी आहे, माझा गोंदिया जिल्ह्यातील आमगाव आणि सालेकसा वर विशेष प्रेम आहे कारण आमगाव ही माझी सासुरवाडी आहे आणि इथे मला येण्याच्या मोह मी आवरू शकत नाही.
मला एक वेगळीच आनंदाची अनुभूती देते. त्यातच शिवसेना पक्षाच्या एक मंत्री म्हणून जिल्ह्याच्या दौरा करीत असताना स्थानिक सर्व कार्यकर्त्यांना ऊर्जा आणि प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्य करण्यासाठी त्यांना सर्वोपरी मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत आहोत आणि मला विश्वास आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार गावागावात नेण्यात आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रमाच्या निमित्ताने आपली उपस्थिती दर्शवून सहकार्य करण्याचे व कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम मी नेहमी करतच राहणार, असे जयस्वाल म्हणाले.