नागपूर : शहरात गुरूवारी सकाळी झालेल्या वादळी पावसाचा फटका नागपूर येथून सकाळी नाशिक आणि पुण्याकडे जाणाऱ्या विमानांना बसला. एक ते दीड तास विलंबाने दोन्ही विमाने पुढच्या प्रवासाला निघाली.

गुरुवारी सकाळी ९ वाजता वादळी वारा आणि पावसाला सुरुवात झाली. अतिशय सुसाट्याचा वारा असल्याने नागपूर विमानतळावर नाशिक आणि पुण्यासाठी उडणारे विमाने दीड तास थांबवून ठेवावे लागले. त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर ताटळत बसावे लागले.

हेही वाचा…ऑनलाईन बुकींगद्वारे नागपुरात देहव्यापार; दिल्ली, उत्तरप्रदेश, कोलकाताच्या पाच तरुणी ताब्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूरहून पुण्याकरिता सकाळी पावणेदहा वाजता विमान होते. तर नागपूर ते नाशिक विमान सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी होते. ढगांच्या गडगडाटासह सकाळी नऊ च्या सुमारासा पावसाला सुरुवात झाली. सकाळपासूनच आकाशात ढगांची गर्दी झाली आणि नऊ वाजताच्या सुमारास शहर पूर्णपणे काळवंडले. त्यानंतर ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वाऱ्यांचा वेगही अधिक होता. पावसामुळे हे दोन्ही विमान एक ते दीड नागपुरातून उड्डाण घेऊ शकले नाही.