लोकसत्ता टीम

नागपूर : राज्य सरकारने ‘माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केल्यानंतर काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली असून योजनांबाबत अप्रचार सुरू केला आहे. लोकांना भ्रमित करण्याचे काम महाविकास आघाडीकडून केले जात आहे. लोकसभा निवडणुकीत आमचा काही ठिकाणी पराभव झाला मात्र ‘एकदा कासव जिंकला म्हणून ससा नेहमीच हरेल’ असे नाही,असे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

भारतीय जनता पक्षाच्या विदर्भाच्या बैठकीनिमित्त सुधीर मुनगंटीवार नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. लाडक्या बहिणींना आम्ही पंधराशे रुपये देण्याचे जाहीर केल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांना सत्तेत येण्याचे जे ‘हसीन सपने’ होते ते भंग होतील अशी भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजनाबाबत अप्रचार करत आहे. या योजनेमुळे राज्य कर्जबाजारी होणार, असा अप्रचार केला जात आहे. मात्र विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्याचे अर्थशास्त्र समजून घेण्याची गरज आहे. आम्ही जेव्हा ४४ लक्ष शेतकऱ्यांना १४ हजार ७०० कोटीची माफी दिली,तेव्हा यांना वाटले की आता वीज माफ झाली.त्यामुळे आम्हाला विजेता करंट तर बसणार नाही ना अशी भीती निर्माण झाली होती.

आणखी वाचा-सोन्याचे दर आणखी घसरले, मात्र चांदीच्या दरात वाढ, हे आहेत आजचे दर..

काँग्रेसचे लोक तर माझी लाडकी बहीण योजनेचा इतका अपप्रचार करत आहेत की ते कधी म्हणतात यामुळे कर्ज होईल, कधी सांगताय आम्ही न्यायालयात जाऊ तर कधी अर्जामध्ये चुका शोधत राज्य सरकारला बदनाम करत आहे. काँग्रेसचे नेते राज्य सरकारची नाही राज्यातील बहिणींची, विद्यार्थ्याची आणि शेतकऱ्यांची बदनामी करत आहे, असा आरोप त्यांनी केला. आघाडीतील काही नेते मंत्रालयातील अधिकाऱ्यांना फोन करून सांगू लागले आहे, की आमचे सरकार आले की मी मंत्री होणार आहे. आत्तापासून जर आघाडीतील नेत्यांच्या व्यवहारात इतका अहंकार असेल तर तो जनताच उतरवेल,असेही मुनगंटीवार म्हणाले.

लोकसभेत संख्येच्या आधारावर आम्ही निवडणूक हरलो, पण याचा अर्थ काय प्रत्येक निवडणूक आघाडी जिंकेल असे नाही. एकदा कासव जिंकला म्हणून ससा नेहमीच हरत राहिल असे नाही. आघाडीतील नेत्यांच्या मनात भीती निश्चित आहे. दोन कोटी ४८ हजार बहिणींना पंधराशे रुपये मिळणार आहे. भाजप पाच वर्षे जनतेचे संकल्प घेऊन काम करणारा पक्ष आहे, महाराष्ट्राची शक्ती वाढावी, स्थिरता राहावी ही भाजपची भूमिका राहिली असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. मंत्रिमंडळाचा विस्ताराबाबत सध्या चर्चा नाही, पण विस्तारासाठी भांडायचे नाही असे महायुतीने ठरवले आहे.

आणखी वाचा-सर्वोच्च न्यायालयाचा सुनील केदार यांना दिलासा देण्यास नकार, मात्र ‘हा’ मार्ग मोकळा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशमुख यांनी पुरावे द्यावेत

अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले तर त्यांचे पुरावे दिले पाहिजे.श्याम मानव यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी द्यावे. पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली पाहिजे नाही तर त्यांची नार्कोटेस्ट केली पाहिजे. राजकारणाचा स्तर घसरला आहे तो बंद झाला पाहिजे असेही मुनगंटीवार म्हणाले.