चंद्रपूर : आजची महिला ही कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. देशाच्या प्रगतीमध्ये सर्वाधिक योगदान महिलांचे आहे. महिलांचे शैक्षणिक आयुष्य उज्ज्वल व्हावे, महिला आत्मनिर्भर व्हावी, स्वतःच्या ज्ञानावर रोजगार शोधू शकेल, यादृष्टीने महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुलाची निर्मिती करण्यात आली. या माध्यमातून येथील महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरण होईल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

नेताजी सुभाषचंद्र बोस डिजिटल मुलींची शाळा, बल्लारपूर येथे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई यांच्या माध्यमातून महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुलाचे लोकार्पण व विविध अभ्यासक्रमांच्या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, भाजपा महानगराध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष अल्का आत्राम, जिल्हाधिकारी विनय गौडा, विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव आदी उपस्थित होते.

हेही वाचा – अमरावती : महापालिकेच्‍या शाळांना इंग्रजी माध्‍यमाचा साज…! आमदार सुलभा खोडके यांचा पाठपुरावा

विशेष म्हणजे, या ज्ञानसंकुलाचे लोकार्पण बल्लारपूर शहरातील गुणवंत विद्यार्थिनी आस्था सुरेश उमरे हिच्या शुभहस्ते झाले. मुनगंटीवार म्हणाले, जिल्ह्यातील व शहरातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानसाधनेसाठी या संकुलाची निर्मिती करण्यात येत आहे. बल्लारपूर-विसापूर रोडवर ५० एकर जागेमध्ये ५६० कोटी रुपये खर्च करून, राज्यातीलच नव्हे तर देशातील महिलांना गौरव वाटेल, असे अप्रतिम विद्यापीठ तयार करण्यात येत आहे. महिलांच्या पारंपरिक खेळांसाठी वातानुकूलित इनडोअर स्टेडियम उभारण्यात येईल.

हेही वाचा – वर्धा जिल्हा ई-ऑफिस प्रणालीत ठरला राज्यात अव्वल, वाचा सविस्तर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे, मुंबई, श्रीवर्धननंतर आता चंद्रपूरमध्ये ज्ञानसंकुल सुरू करण्यात आले आहे. पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नाने, पाठिंब्याने व पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले, असे कुलगुरू डॉ. चक्रदेव यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते विद्यापीठाच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. त्यासोबतच १० वी व १२ वी परीक्षेत उत्तीर्ण बल्लारपूर येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.