लोकसत्ता टीम

नागपूर: एका शिक्षिकेने आपल्या दहा वर्षीय मुलीसह कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही हृदयद्रायक घटना बुटीबुरीमध्ये उघडकीस आली. चेतना शिरीष भक्ते (३५) रा.ओम साई नगर, बुटीबोरी असे मृत शिक्षिकेचे तर हर्षिका असे मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतना भक्ते या एका खासगी शिक्षण संस्थेच्या शाळेत शिक्षिका आहे. ती आईवडिलांच्या घरी मुलीसह राहत होती. रविवारी सकाळी तिचे आईवडिला झोपेतून उठले आणि चहा घेण्यासाठी चेतना हिला आवाज दिला. मात्र, खोलीतून प्रतिसाद न मिळाल्याने तिच्या वडिलांनी घरात डोकावून बघितले. चेतना मृतावस्थेत तर हर्षिता हिच्या हृदयाचे ठोके सुरु होते.

हेही वाचा… अमरावती : राणा दाम्‍पत्‍याच्या समर्थनार्थ फासेपारधी बांधवांचा मोर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चेतनाच्या वडिलांनी शेजाऱ्यांच्या मदतीने हर्षिका हिला रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान हर्षिका हिचाही मृत्यू झाला. शाळेत चोरी झाल्यानंतर चेतना यांच्यावर चोरीचा आळ घेण्यात आला, त्यामुळे चेतना यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा. तसेच आपल्या मृत्यूनंतर मुलगी हर्षिता हिच्या भविष्याची चिंता सतावत असल्यामुळे चेतना हिने मुलीलाही कीटकनाशक पाजले, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.