चंद्रपूर : पक्ष, कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीनिशी उभे राहणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे. संवैधानिक पदावर स्थान देण्याचा विषय आला तर, राष्ट्रवादी काँग्रेस समितीला प्राथमिकता दिली जाईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.

प्रदेशाध्यक्ष तटकरे मंगळवारी सायंकाळी चंद्रपूर दौऱ्यावर होते. विश्रामगृह येथे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, शहराध्यक्ष राजीव कक्कड यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रपरिषदेत तटकरे यांनी सतत २५ वर्षे विदर्भाकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे मान्य केले. ‘घड्याळ तीच, वेळ नवी’ अशी घोषणा देत आता आम्ही संपूर्ण विदर्भ पिंजून काढत आहोत. विदर्भात पक्ष संघटन वाढवण्यात यश मिळाले नाही, मात्र पुढे नक्कीच यश मिळेल, अशी आशा आहे. २०१९ मध्ये राज्यात ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या त्यामुळे जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. राज्यातील जनता योग्य निर्णय घेईल व लोकसभा, विधानसभा निवडणुकीत विजयी करेल. आगामी निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपामध्ये विलीन होणार नाही, असेही तटकरे यांनी सांगितले.

हेही वाचा – नागपुरातील वाहतूक यंत्रणेकडे खासगी ट्रॅव्हल्सच्या नियमबाह्य कृत्याची कुंडली! कारवाईची तंबी

हेही वाचा – चंद्रपूर : हातात उभारी घेण्याची वेळ येऊ देऊ नका – नरेश पुगलिया; कामगारांना दोन दिवसांत बोनस देण्याचे आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठ्यांना आरक्षण मिळावे ही सरकारची व पक्षाची भूमिका आहे. ओबीसी मुद्यावर छगन भुजबळ पक्षात एकाकी पडले आहेत, असे विचारले असता तसे काहीही नाही, असे तटकरे म्हणाले. जरांगे यांचे आंदोलन सरकारपुरस्कृत की विरोधकपुरस्कृत यावर त्यांनी मौन बाळगले, तर सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेवर आपण शूद्र आहे, याबाबत विचारले असता तो विषय आपल्यासाठी संपला असल्याचे ते म्हणाले.