लोकसत्ता टीम

वाशीम : लोकसभा निवडणुकीत महिला मतदाराच्या मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रशासनातर्फे अनेक प्रयत्न केल्या जात आहेत. धनज खुर्द सर्कलचे पर्यवेक्षक तथा जिल्हा परिषद विद्यालय कामरगावचे सहाय्यक शिक्षक गोपाल वसंतराव खाडे व त्यांच्या सुविद्या पत्नी नीता यांनी आपल्या निवासस्थानी मतदान जनजागृतीची गुढी उभारून मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित केले. प्रत्येकाने आपापल्या परीने मतदानाचा टक्का वाढवावा त्यासाठी प्रयत्नशील आहे.

वाशीम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी बुवनेश्वरी एस, उपविभागीय अधिकारी कैलास देवरे,तहसीलदार कुणाल झाल्टे, निवडणूक नायब तहसीलदार बनसोडे, विनोद हरणे यांच्या मार्गदर्शनात खाडे कुटुंबियांनी मतदान जनजागृतीची गुढी उभारली. मतदानाची जनजागृती करताना विशेष करून त्यांनी महिला, दिव्यांग तसेच ८५ वर्षांवरील जेष्ठ मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

आणखी वाचा-यवतमाळ : मध्यरात्री अपघातग्रस्तास घेवून महायुतीच्या उमेदवार दवाखान्यात

भारत हा भक्कम लोकशाही असलेला देश आहे. मतदानाबद्दल जनसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी, चांगले, आदर्श व सुशिक्षित उमेदवार निवडून यावेत, मतदानाची टक्केवारी वाढावी याचा संदेश गुढीच्या माध्यमातून देण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून गुढीच्या माध्यमातून दरवर्षी खाडे कुटुंबीय पर्यावरण वाचवा, लेक वाचवा, चिमणी वाचवा, यासारखे संदेश देत असतात. यावर्षीचा उत्कृष्ट पर्यवेक्षकाचा पुरस्कार देऊन गोपाल खाडे यांना जिल्हाधिकारी भुवनेश्वर एस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावर्षी येत्या २६ एप्रिलला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीचे औचित्य साधून मतदान जनजागृती गुढी उभारली आहे. खाडे कडून यांनी मतदार यादीत नाव असलेल्या सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

आणखी वाचा-लोकशाहीची खरी ताकद! दिव्यांग व्यक्तीच्या एका मतासाठी यंत्रणा दुर्गम गावात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तहसीलदार,कुणाल झाल्टे, निवडणूक नायब तहसीलदार बनसोडे, नायब विनोद हरणे,राहुल वरघट,महेश धानोरकर,महेश मुकीरवार यांनी भेट देऊन खाडे कुटुंबियांचे कौतुक केले.यावेळी नीता खाडे यांनी सर्व महिला मतदारांनी आवर्जून मतदान करण्याचे आवाहन करून आपल्या जिल्ह्याचा मतदानाचा टक्का वाढविण्याचे आवाहन केले आहे.