नागपूर: तलाठी परीक्षेत घोटाळेबाजांचे रॅकेट सक्रिय आहे. थेट परीक्षा केंद्रात उत्तरे पुरवली जात असल्याचे समोर आले तलाठी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेची कॉपी तीन लाखांत विकली जात आहे. अटकेतील आरोपी नागरे इऑन परीक्षा केंद्रातील एका कर्मचाऱ्याच्या मदतीने परीक्षा केंद्रावर उत्तरे पाठवत होता. उत्तरपत्रिका पाठवण्यासाठी एका विद्यार्थ्याकडून तीन लाख रुपये घेत होता. नागरेच्या मोबाइलमध्ये त्या कर्मचाऱ्याचा नंबर ‘बाबा’ या नावाने सेव्ह असल्याचे समोर आले.

चिकलठाण्यातील इऑन परीक्षा केंद्राबाहेरून परीक्षार्थीला उत्तरे पुरवण्याच्या तयारीत असलेला राजू भीमराव नागरे याला पोलिसांनी ५ सप्टेंबरला अटक केली होती. या रॅकेटमध्ये ७ जण आरोपी असल्याचे सिद्ध झाले आहे. रॅकेटचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत असल्याने पोलिस त्याच दिशेने तपास करत आहेत.

हेही वाचा… राज्यातील सहा जिल्ह्यांना आज ‘ऑरेंज अलर्ट’; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, १७ सप्टेंबर पर्यंत पावसाचा जोर कायम

एमआयडीसी सिडको पोलिस दुचाकी चोराच्या शोधात होते. तेव्हा केंद्रासमोर चार तरुण संशयास्पद दिसले. पोलिसांनी त्यांना हटकले असता तिघांनी धूम ठोकली. राजू मात्र हाती लागला. त्याच्या खिशात मास्टर कार्ड, दोन मोबाइल मिळाले. त्यातील टेलिग्रामवर ३४ प्रश्नांचे छायाचित्र होते.

हेही वाचा… पश्चिम विदर्भात आठ महिन्यांत ७३७ शेतकरी आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजूने सकाळी ९ वाजेच्या परीक्षेत एका उमेदवाराला उत्तरे पुरवल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले. परीक्षा केंद्रातून हे रॅकेट चालत असून एका परीक्षार्थीला उत्तरपत्रिकेची चिठ्ठी देण्यासाठी आतील कर्मचारी ३ लाख रुपये घेत असल्याचे तपासात सिद्ध झाले आहे. या रॅकेटची व्याप्ती मोठी अाहे. अजून ६ आरोपींची नावे समोर आली आहेत. अटक केलेल्या आरोपीविरुद्ध सांगलीत २०२१ मध्ये परीक्षेत घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.