नागपूर: शहरासह राज्यभरात चोरीच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. मात्र, परिवहन विभाग म्हणजे आरटीओ कार्यालयही सुरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे.

नागपूर ग्रामीण परिवहन कार्यालयात पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करणारा एक प्रसंग घडला. चारचाकी वाहनाचा परवाना तयार करण्यासाठी या कार्यालयात गेलेल्या एका नागरिकाची नवीकोरी होंडा कंपनीची कार चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे.

हेही वाचा… राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा वर्धा दौरा रद्द, वादाची बाब कुलगुरूंनी फेटाळली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही घटना मंगळवारची आहे. नागरगोजे नामक गाडी मालक परवाना तयार करण्यासाठी परिवहन कार्यालयात गेले. येथील वाहनतळामध्ये त्यांनी आपली कार उभी केली आणि आपला नंबर येण्याची वाट पाहू लागले. काही वेळाने त्यांचा नंबर आला. मात्र, ट्रायल देण्यासाठी कार आणायला गेले असता तेथे कारच नव्हती. इकडेतिकडे शोधाशोध केली, मात्र कार काही मिळाली नाही. शेवटी परिवहन विभागामध्ये कार चोरीची तक्रार नोंदवली. या गंभीर प्रकाराने पोलीस विभागातही वाहने सुरक्षित नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.