नागपूर: महाविकास आघाडीतर्फे सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विधान भवनाच्या पायरीवर अनोखे अभंग आंदोलन केले गेले. या प्रसंगी टाळ वादन वदिंडी आंदोलन करीत सरकारचा धिक्कार केला. भूखंड घ्या.. कुणी गायरान घ्या.. खोक्यानं घ्या.. कुणी खोऱ्यानं घ्या.., कुणी गुवाहाटीला जा कुणी सुरतला जा.. असे अभंग गात सत्ताधारी पक्षाविरोधात सूर आवळला.

मंगळवारी सकाळी विरोधीपक्ष सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर अभंग गात आंदोलन केले. भूखंड घोटाळ्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, उदय सामंत, संजय राठोड यांच्या नावाने शिमगा केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळील काँग्रेस कार्यालयाजवळून मोर्चाला सुरुवात झाली.

फुगडी खेळणाऱ्यांत यशोमती ठाकूर, रोहित पवार यांच्यासह इतरही आंदोलकांचा समावेश होता. सर्व आमदारांनी डोक्यात पांढऱ्या टोप्या परिधान करून गळ्यात टाळ अटकवून वाजवत विधान भवनाच्या पायऱ्यांजवळ येऊन आंदोलन सुरू केले. या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

हेही वाचा: चंद्रपूर: दोन महिन्यांच्या बाळाची तस्करी अन् विक्रीचा प्रयत्न फसला; दोन आरोपींना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदी का नाम जपना, पराया माल अपना, लवकर लुटा तुम्ही लवकर लुटा, महाराष्ट्राला लुटा तुम्ही जनतेला लुटा, गुवाहाटीला चला तुम्ही सुरतेला चला, खोके घ्यायला चला.. अशा घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनाला विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले, अमोल मिटकरी, भास्कर जाधव, प्राजक्त तनपुरे आदिंचा सहभाग होता.