वाशीम : मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी होत होती. अखेर औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर असे नामांतर झाले. मात्र, हिंदू हृदयसम्राट समृद्धी महामार्ग लावलेल्या पाट्यांवर छत्रपती संभाजीनगर नव्हे तर औरंगाबाद हेच नाव दिसत आहे.

राज्यातील औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर असे नामांतर करण्यात आले. त्यानंतर अनेक ठिकाणी औरंगाबाद नावाच्या पाट्या बदलून छत्रपती संभाजी नगर अशा करण्यात आल्या आहेत. परंतु हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर लावलेल्या औरंगाबाद नावाच्या पाट्या मात्र बदलण्यात आल्या नसल्याचे दिसून येते. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये या नावावरून चर्चा रंगत आहे. या मार्गावर असलेले औरंगाबाद नाव बदलून छत्रपती संभाजी नगर होणार की जुनेच नाव कायम राहणार यावरून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.