नागपूर : उपराजधानी नागपुरात वेगवेगळ्या कामानिमित्त देश-विदेशातून येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय ताडोबा, पेंच, कऱ्हाडला, मध्य प्रदेशमधील पेंच, कान्हाकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ये-जा करणाऱ्यांची संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल ४१ टक्क्यांनी वाढली आहे.

करोना काळात प्रवाशांची संख्या घटली होती. ही संख्या प्रत्येक महिन्याला ३० ते ४० हजारांपर्यंत खाली आली होती. आता मात्र, दर महिन्याला २.५ लाखांपर्यंत प्रवाशी संख्या वाढली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, २०२३ च्या पहिल्या सहामाहीत (जानेवारी ते जून) नागपूर विमानतळाहून १५ लाख २५ हजार ५२८ लोकांनी प्रवास केला. गेल्यावर्षी याच कालावधीत १ लाख ८० हजार ३८४ प्रवाशांनी प्रवास केला होता. म्हणजेच यावर्षी तब्बल १३,४५,१४४ अधिक प्रवाशांनी विमान प्रवास केला.

हेही वाचा – देशाला हिंदू राष्ट्र करण्यासाठी डॉ. आंबेडकरांवर दबाव होता; माजी खासदार डी. राजा यांचे विधान

नागपूरहून देशाअंतर्गंत आणि परदेशात प्रवास करणाऱ्यांच्या संख्येतदेखील मोठी वाढ दिसून येत आहे. मागील वर्षी पहिल्या सहामाहीत (२०२२) नागपूर येथून परदेशात प्रवास करणाऱ्यांची संख्या १९ हजार २५० होती. चालू वर्षात (२०२३) ४५ हजार २६७ प्रवासी परदेशात गेले. देशाअंतर्गत प्रवास करणाऱ्यांच्या संख्येतदेखील वाढ झाली आहे. गेल्यावर्षी पहिल्या सहामाहीत १० लाख ६१ हजार १३४ प्रवासी संख्या होती. चालू वर्षात ही संख्या १४ लाख ८० हजार २६१ वर पोहोचली आहे.

हेही वाचा – गोंदिया जिल्ह्यात ३१८० महिलांना थायरॉईडचा विळखा; शहरासह ग्रामीण भागातही लोण; महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूर विमानतळावर प्रवाशांची ये-जा वाढली आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. – मो. अब्दुल आबिद रुही, कार्यकारी संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ.