लोकसत्ता टीम

वर्धा: पावसाळ्याची बेगमी म्हणून घरोघरच्या गृहिणी आता लोणचे, तिखट, मसाले तयार करून ठेवण्याच्या कामाला लागल्या आहेत. मात्र, मिरची खरेदी नाकाला चांगलीच झोंबू लागली असल्याचे बाजारातील चित्र आहे.

किरकोळ बाजारात सर्वाधिक भाव चारशे तीस रुपये किलो पाटणा मिरचीस आहे. रंग, चव व डौलदार आकाराची ही मिरची चांगलीच कडाडली आहे. रेशीम पट्टा तीनशे तीस, भिवपुरी दोनशे वीस तर ‘सी वन’ अडीचशे रुपये प्रतिकिलो पडत आहे. अवकाळी पावसाने व नैसर्गिक आपत्तीने मोठ्या प्रमाणात मिरचीचे पीक उद्ध्वस्त झाल्याचे ऐकायला मिळाले.

हेही वाचा… नागपूर: लकडगंजमध्ये १८ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त; ‘लोकसत्ता’च्या बातमीची दखल

प्रामुख्याने परतवाडा, घाटंजी, भिवापूर, अर्जुनी मोरगाव, चिखलदरा हे मिरचीचे आगार समजल्या जातात. पण उत्पादन कमी व मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने गणित बिघडले. यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा भागातून राज्यात मिरची येत असल्याचे सुप्रसिद्ध लोणचे विक्रेते अतुल केळकर यांनी सांगितले. आम्हाला लोणचे व मसाल्यांसाठी मोठ्या प्रमाणात वाळलेली लाल मिरची लागते.

हेही वाचा… गडचिरोली : “सुरजागड प्रकल्प लोकांच्या जीवावर उठला; लॉयड मेटल्सवर हत्येचा गुन्हा दाखल करा”, काँग्रेस आक्रमक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या तीन वर्षापासून या मिरचीचे भाव वाढत आहे. म्हणून ओल्या लाल मिरच्या विकत घेवून त्या वाळविणे व तिखट करण्याचा मार्ग स्वीकारला, असे केळकर नमूद करतात. पण मागणी वाढत असल्याने चढ्या भावातही घ्यावी लगत असल्याचे वास्तव त्यांनी सांगितले. भिवापूरचे मिरची उत्पादक नंदू पाचभाई हे सांगतात की, मिरची हे नाजूक पीक आहे. हवामान बिघडले की त्यास लगेच फटका बसतो. म्हणून लागवड क्षेत्र वाढत नसून मागणी मात्र सातत्याने वाढत आहे. मग मिरची महागणारच.