बुलढाणा: कृषिप्रधान बुलढाणा जिल्ह्याची खरीप हंगामाची दुसऱ्या टप्प्यातील अर्थात सुधारित पैसेवारी संभाव्य दुष्काळ दर्शविणारी आहे. त्यामुळे सध्या दोन तालुके दुष्काळ ग्रस्त म्हणून घोषित झाली असली तरी अंतिम पैसेवारीत तालुक्यांची संख्या जास्त राहण्याची दाट शक्यता आहे.

यंदाच्या खरीप हंगामात ७.४० लाख हेक्टरवर खरीप पिकांचा पेरा करण्यात आला होता. अपुऱ्या व अनियमित पावसाने पिकांची वाढ व नंतर उत्पादनात लक्षणीय घट झाली. सप्टेंबर मध्ये घोषित झालेल्या नजर अंदाज पैसेवारीत या गंभीर स्थितीचे प्रतिबिंब उमटले नाही. मात्र ऑक्टोबर अखेरीस जाहीर झालेल्या सुधारीत पैसेवारीत मात्र याची चिन्हे दिसून आली.

हेही वाचा… तीन डॉक्टर ठरले “दिव्यांगी” साठी देवदूत; जहाल मण्यार सापाचे मुलीच्या अंगात पसरलेले विष यशस्वीरित्या बाहेर काढले

अलीकडेच दुष्काळ जाहीर झालेल्या लोणार तालुक्याची पैसेवारी केवळ ४८ इतकी तर बुलढाण्याची ५३ पैसे निघाली आहे. मेहकर तालुक्याचा(६१ पैसे) अपवाद वगळता उर्वरित १२ तालुक्यांची पैसेवारी ५६ च्या खालीच आहे. चिखली ५२, देऊळगाव राजा ५५, मलकापूर ५४ , मोताळा , नांदुरा, खामगाव ,शेगाव या तालुक्यांची प्रत्येकी ५६ पैसे, जळगाव ५५ तर संग्रामपूर ५४ अशी इतर तालुक्यांची पैसेवारी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिकनिहाय स्थिती

दरम्यान जिल्ह्यातील तीन मुख्य पिकांची पैसेवारी अर्थात स्थिती गंभीर म्हणावी अशीच आहे. तब्बल ४,२०,२६५ हेक्टरवर पेरा झालेल्या सोयाबिन ची १,८०, २१२ हेक्टरवर असलेल्या कपाशीची ५६ तर दहा हजार हेक्टरवर असलेल्या मक्याची पैसेवारी ५४ निघाली आहे. यामुळे या तिघा पिकांच्या उत्पादनात लक्षणीय घट येणार हे उघड आहे. यंदा काढणी झालेल्या सोयाबिन चे एकरी उत्पादन ५ ते ६ क्विंटल इतकेच आले आहे.