अकोला: राष्ट्रीय महामार्गावरील कुरुमनजीक कामगाराने शेरे बिहार ढाबा मालकाची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी माना पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. करोना काळात ज्याला आधार दिला, तोच काळ बनून उलटल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

नवसाळ फाट्याजवळ आलम भाई व मो. शोएब अंसारी यांचा शेरे बिहार ढाबा आहे. करोना काळात ३५ वर्षीय दुल्हाचंद नामक युवक ढाब्यावर पायी चालत आला होता. मदतीची याचना केल्यावर ढाबा मालकाने त्याला कामावर ठेवले. तेव्हापासून तो ढाब्यावरच राहत होता. दरम्यान, सोमवारी ढाबा मालक व कामगारात किरकोळ वाद झाला. या वादातूनच कामगार दुल्हाचंद ढाबा मालक मो. शोएब अंसारी (३८) यांच्यामागे कुऱ्हाड घेऊन धावत गेला. त्याने कुऱ्हाडीने सपासप वार केल्याने ढाबा मालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

हेही वाचा… सुटलो एकदाचे! आता उत्पन्नाचा दाखला दरवर्षी देण्याचे बंधन नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेची माहिती मिळताच माना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. आरोपी दुसऱ्या राज्यातील असल्याने त्याला भाषा कळत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.