कन्हान नदीमध्ये खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राची राख आल्याने कन्हान जलशुद्धीकरण केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे उत्तर व पूर्व नागपुरातील २८ जलकुंभातून कमी प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात आला. याचा उत्तर, पूर्व आणि दक्षिण नागपुरातील वस्त्यांनाही फटका बसणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?

दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राच्या तलावातून राख वाहून ती कन्हान नदीत आली आहे. कन्हानमध्ये नदीच्या काठावर महापालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र असून तेथील विहिरीत कन्हानच्या पाण्यावर शुद्धीकरण केले जाते. राख मिश्रित पाण्यामुळे त्यावर प्रक्रिया करता येत नाही. परिणामी नदीच्या उजव्या काठावरील कच्च्या पाण्याचे पंप बंद करण्यात आले. त्यामुळे जलशुद्धीकरणाचे काम पूर्णपणे थांबवण्यात आले आहे. येथून उत्तर, पूर्व आणि दक्षिण नागपूरमधील आशीनगर झोन, नेहरूनगर झोन, लकडगंज झोन आणि सतरंजीपुरा झोनमधील २८ जलकुंभाद्वारे अनेक वस्त्यांना पाणीपुरवठा केला जातो.

हेही वाचा : संघाच्या विरोधात मोर्चा काढणारे वामन मेश्राम आहेत कोण?

केंद्र बंद करण्यात आल्याने या वस्त्या कमी प्रमाणात पुरवठा करण्यात आला. अशीच स्थिती राहिली तर पुढील आणखी काही दिवस उत्तर व पूर्व नागपुरातील २८ जलकुंभांतून पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. यासंदर्भात ओसीडब्लू, महापालिका, खापरखेडा औष्णिक केंद्राच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली असून यावर तात्काळ लवकरच तोडगा काढण्याचे आदेश आयुक्तांना दिले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thermal power station ash again in kanhan river water suuply close nagpur tmb 01
First published on: 12-10-2022 at 12:59 IST