विदर्भातील तीन जिल्ह्यांसह राज्यातील एकूण ९ जिल्ह्यांत करोनाचे ‘एक्स बीबी’ या नवीन उपप्रकाराचे रुग्ण आढळले. हा सगळ्यात गतीने पसरणारा विषाणू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या रोगाची तीव्रता विदर्भासह राज्यात वाढली नसल्याने आरोग्य विभागाला मोठा दिलासा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ‘वैद्यकीय शिक्षकांचे प्रश्न शिंदे-फडणवीस सरकारने मार्गी लावावे’; महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेची मागणी

राज्यात आजपर्यंत एक्स बीबीचे १३४ रुग्ण आढळले. त्यातील सर्वाधिक ७२ रुग्ण हे मुंबईतील आहेत. पुणे- ४६ रुग्ण, ठाणे ८ रुग्ण, नागपूर आणि भंडारात प्रत्येकी २ रुग्ण, अकोला, अमरावती, रायगड, कोल्हापूर या जिल्ह्यांत प्रत्येकी १ रुग्ण आढळला. विषाणूची रोगाची तीव्रता वाढवण्याची गती सर्वाधिक असल्याचा सूर वैद्यकीय क्षेत्रात होता. परंतु प्रत्यक्षात या रोगाची तीव्रता या भागात नसल्याचे गेल्या दोन आठवड्यातील घसरलेल्या रुग्णसंख्येवरून दिसत आहे.

हेही वाचा- नागपूर : महाठग अजित पारसेची अटकेपासून वाचण्यासाठी मोर्चेबांधणी, जामिनावर निर्णय आज

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाच्या अहवालात ७ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर आणि १३ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२२ या दोन आठवड्याची राज्यातील करोनाच्या रुग्णांची तुलना केली गेली. त्यात सप्ताहातील दैनंदिन करोनाग्रस्तांमध्ये १ हजार ३७ पासून ७७३ पर्यंत म्हणजे २५.४६ टक्के घट झाल्याचे दिसत आहे. या आठवड्यात करोनाचे राज्यात केवळ ३ मृत्यू नोंदवले गेले. रुग्णांच्या तुलनेत हा मृत्यूदर ०.३९ टक्के आहे. या आठवड्यातील राज्यभरातील चाचण्याच्या सकारात्मक अहवालाचे प्रमाण १.१५ टक्क्यांवरून ०.८९ टक्क्यांवर आले. परंतु अकोला, पुणे, कोल्हापूर, जालना आणि सांगली जिल्ह्यातील साप्ताहिक सकारात्मक अहवालाचे प्रमाण २ टक्क्यांहून जास्त आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three districts of vidarbha have found patients of the new subtype of corona x bb dpj91
First published on: 22-11-2022 at 10:15 IST