लोकसत्ता टीम

वाशीम: समृध्दी महामार्गावर एका खासगी बसवर दगडफेक करून लुटण्याचा प्रकार ताजा असतानाच सोमवारी रात्री दोन वाजेदरम्यान कांद्याने भरलेल्या ट्रकचा अपघात होऊन पेट घेतला. यामधे ट्रक जळून राख झाला असून यामधे चालक व इतर एकाचा जाळून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिवसेंदिवस समृध्दी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. वाढत्या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात असल्या तरी अपघाताचे सत्र थांबता थांबेना. १७ जून रोजी एका खासगी बसेस वर दगडफेक करून लुटमार करण्याचा प्रयत्न फसल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी रात्री दोन वाजे दरम्यान कारंजा महामार्ग जवळ कांद्याने भरलेल्या ट्रक चालकाला डुलकी लागली आणि ट्रकचा अपघात झाला. त्यानंतर ट्रकने अचानक पेट घेतला. यामधे ट्रक जळून राख झाला आहे. ट्रकमधील चालक व इतर एकाचा जळून मृत्यु झाल्याची घटना घडली. मयताची ओळख पटली नसून यामधे जळालेल्या अवस्थेत असलेले दोन मृतदेह कारंजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले असून कारंजा शहर पोलीस सदर घटनेचा अधिक तपास करीत आहेत.