चंद्रपूर : वाघांच्या तुम्ही नानाविध अदा बघितल्या असेल. अनेकांनी वाघांना खेळतांना बघितलेले आहे. तर कुणी त्यांना मौजमस्ती करतांना बघितले. काहींनी तर त्याही पलिकडे जाऊन वाघांची प्रणयक्रिडा बघितलेली आहे. तुम्ही शौच करणारा बघितला आहे काय? वाघ शौच कसा करतो? हे  तुम्हाला आहे काय? यावर अनेकांची उत्तरं नाही अशीच येतात. पण आम्ही शौच करीत असेला वाघ बघितला आहे. त्याचाच हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओचं क्रेडीट वरोरा येथील डॉ. हेमंत खापणे यांनाच जाते. त्यांनी मोठ्या शिताफीने हा क्षण आपल्या कॕमेरामध्ये कैद केला आहे.

वरोरा येथील आनंद निकेतन महाविद्यालयात सन १९९१-९२ मध्ये इयत्ता बारावीत शिक्षण झालेल्या डॉ. हेमंत खापणे यांनी आपल्या मित्रांसह काही दिवसांपूर्वी ताडोबा सफारी केली. ताडोबामध्ये पावसाळ्यात वाघ बघायला मिळत नाही, हा अनुभव आहे. पण एकतीस वर्षानंतर एकत्र आलेल्या या मित्रांना एकाचवेळी बबलीच्या तीन बछड्यांनी दर्शन दिले. पाच ते सहा मिनिटं ही बछडे आपआपसात खेळत होती. काही वेळानंतर बबलीचा एक बछडा बाहेर आला. तो एका छोट्या झुडपाजवळ गेला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका मित्राने त्याला शौचास लागली असावी, असा अंदाज बांधला. त्याचा अंदाज खरा ठरला. डॉ. खापणेंनी क्षणाचाही विलंब न लावता शौच करीत असलेल्या वाघाचा प्रसंग अखेर टिपलाच. जीवनात पहिल्यांदाच शौच करणारा वाघ बघायला मिळाल्याने मित्रमंडळींनी समाधान व्यक्त केले. जीवनात असा दुर्मिळ प्रसंग बघायला मिळणे, यापेक्षा दुसरा आनंद दुसरा कोणता असूच शकत नाही, असे अरूण उमरे यांनी यावेळी सांगितले.