scorecardresearch

बचतगटांसाठी ‘कॉमन फॅसिलिटी सेंटर’ उभारणार; शाहू परिवाराचे संदीप शेळके यांची घोषणा

बचतगटांसमोर अनेक अडचणी असून त्या सोडवण्यासाठी बुलढाण्यात  ‘कॉमन फॅसिलिटी सेंटर’ उभारणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी केली.

Sandeep Shelke
संदीप शेळके

बुलढाणा : जिल्ह्यात महिला बचतगटांची चळवळ सक्रिय आहे. मात्र बचतगटांसमोर अनेक अडचणी असून त्या सोडवण्यासाठी बुलढाण्यात  ‘कॉमन फॅसिलिटी सेंटर’ उभारणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी केली. महिला आर्थिक विकास महामंडळच्यावतीने स्थानिक जिजामाता व्यापार संकुलात आयोजित बचतगट उत्पादन विक्री व प्रदर्शनात ते बोलत होते. 

नियोजित ‘कॉमन फॅसिलिटी सेंटर’मध्ये, बचतगटांना लागणारा कच्चा माल, ब्रँडिंग, गुणवत्ता मापदंड, बाजारपेठ, विक्री आणि सर्व प्रकारचे प्रमाणपत्र एकाच छताखाली उपलब्ध राहणार आहे. यावेळी संदीप शेळके म्हणाले की, महिला बचतगट चळवळीला जुना इतिहास आहे. बांगलादेशचे प्रा. मोहम्मद युनूस यांनी १९७० मध्ये महिला बचतगटाची स्थापना केली. त्यानंतर ही चळवळ जगभर पसरली. बुलढाणा जिल्ह्यात बचतगटांचे व्यापक जाळे असून त्यासोबत संलग्न लाखो महिला आत्मनिर्भर झाल्या आहेत. राजर्षी शाहू मल्टिस्टेट पतसंस्थेने  बचतगटांच्या २० हजार महिलांना ७० कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य केले आहे.

हेही वाचा >>> अमरावती : अंनिसने ‘हे’ आव्‍हान देताच गुरूदास बाबाचे गावातून पलायन, वाचा नक्की काय घडले?

माविम, उमेदचे काम चांगले,पण…

माविम, उमेद ह्या शासकीय संस्थांचे काम चांगले आहे. परंतु त्यांना व्यवसाय करण्याबाबत मर्यादा आहेत. यासाठी काम करणारी एखादी संस्था जिल्ह्यात असली पाहिजे, याकरिता पुढाकार घेणार असल्याची ग्वाही शेळके यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 19:24 IST

संबंधित बातम्या