नागपूर : महाविकास आघाडीची १६ एप्रिलला पूर्व नागपुरात केडीके महाविद्यालयाजवळील दर्शन कॉलनी मैदानात होणाऱ्या वज्रमुठ सभेला विरोध करण्यावरून भाजपमध्ये दोन गट पडले आहे. भाजपचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांनी सभेला पक्षाचा कुठलाही विरोध नाही, असे स्पष्ट केले तर याचा पक्षाचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे आणि माजी नगरसेवक हरीश डिकोंडवार यांनी मात्र सभेला विरोध असल्याचे सांगितले. त्यामुळे मविआची वज्रमुठ सैल करण्याच्या प्रयत्नात भाजपमध्ये दुफळी निर्माण झाली आहे.

हेही वाचा >>> चंद्रपूर : …अन् कुटुंबीयांनी वृद्धाचा मृतदेह चक्क आरोपींच्या घरासमोरच नेवून ठेवला, गावात तणाव

१६ एप्रिलला महाविकास आघाडीची नागपुरात दर्शन कॉलनी येथील मैदानात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.या    मैदानात खेळणाऱ्या खेळाडूनी या सभेला विरोध केल्याचे कारण देत भारतीय जनता पक्षाचे आमदार कृष्णा खोपडे आणि माजी नगरसेवक हरीष डिकोंडवार यांनी जाहीर सभेसाठी मैदान देऊ अशी मागणी  नागपूर सुधार प्रन्यासकडे केली.  दुसरीकडे भाजपचेच शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांनी  महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला भाजपचाज्ञकुठलाही विरोध नसल्याचे सांगितले. केवळ मैदान खराब होऊ नये याची काळजी आयोजकांनी घ्यावी, असे आवाहन केले.

हेही वाचा >>> नागपूर : बाऊन्सर्सच्या गुंडागर्दीचा ‘व्हिडिओ व्हायरल’; पबमधील युवकाला जबर मारहाण, उपराजधानीत खळबळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार कृष्णा खोपडे  म्हणाले, , शासकीय निधीतून नागपूर सुधार प्रन्याने मैदान विकसित केले आहे. शिवाय परिसरात राहणाऱ्या नागरिकांची मैदान राजकीय सभेला देण्यासाठी वारंवार तक्रार केली जात असल्यामुळे महाविकास आघाडीच्या सभेला देण्यात आलेली परावनागी तात्काळ रद्द करण्यात यावी. महाविकास आघाडीच्या सभेवरुन भाजपमध्ये दोन मतप्रवाह समोर येऊ लागल्याने पक्षाची वज्रमुठ सैल होत चालली असल्याचे समोर आले आहे.