बुलढाणा : मृत्यूचा सापळा ठरलेल्या समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका कायम आहे. तांत्रिक उणिवा आणि चालकांची हयगय यामुळे समृद्धी महामार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. मंगळवारी रात्री उशिरा समृद्धी महामार्गावर अतिवेगाने दोन बळी घेतले. या दुर्घटनेत दाम्पत्याचा मृत्यू झाला, तर वाहन चालक मुलगा गंभीर जखमी झाला असून, मृत्यूशी झुंज देत आहे. जखमीवर सिंदखेडराजा येथे उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – चंद्रपूर जिल्हा बँकेत सव्वातीन कोटींची अनियमितता; संचालक मंडळ व अधिकाऱ्यांना नोटीस, “११ एप्रिलपर्यंत लेखी उत्तर सादर करा, अन्यथा..”

हेही वाचा – अंतराळातून कोसळलेले रिंग व सिलिंडर चीनच्या उपग्रहाचे अवशेष; इस्रो, चंद्रा ऑब्जर्वेटरी संस्थेचा दावा, सरकारला अहवाल सादर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंगळवारी रात्री उशिरा बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर दुसरबीडजवळील नागपूर कॉरिडॉर येथे पुण्याहून नागपूरकडे जाणारी भरधाव क्रेटा कार समोरील वाहनावर धडकली. ही धडक एवढी भीषण होती की त्यात एकाच कुटुंबातील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अमित पाध्ये आणि इश्वरी पाध्ये अशी मृतांची नावे आहेत. या दुर्घटनेत त्यांचा मुलगा आशीष पाध्ये (चालक) गंभीर जखमी झाला. पाध्ये कुटुंब पुण्याहून नागपूरकडे जात होते.